AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यावर वाद नको म्हणून टेम्पोत नेले, त्यानंतर सासूला पेटवून दिले; जावयानेही स्वत:.. मुलुंडमधील घटनेने मुंबई हादरली

मुलुंड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जावयाने आपल्या सासूला पेटवून दिल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली आहे. घटस्फोटानंतर सासूला जबाबदार धरत जावयाने हा निर्णय घेतल्याचे समजते. पोलिसांनी हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित सासूचे वय 72 तर जावयाचे वय 59 होते.

रस्त्यावर वाद नको म्हणून टेम्पोत नेले, त्यानंतर सासूला पेटवून दिले; जावयानेही स्वत:.. मुलुंडमधील घटनेने मुंबई हादरली
जावयाने सासूला पेटवलं, नंतर स्वत:लाही संपवलं
| Updated on: Feb 26, 2025 | 2:15 PM
Share

मुंबईतील अत्यंत गजबलेलं ठिकाण असलेल्या मुलुंडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. आपला संसार मोडण्यात सासूच कारणीभूत असल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासूला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आधी सासूला पेटवून दिले, त्यानंतर त्यानेही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अदिक तपास सुरू आहे. मात्र, या घटनेने मुलुंडच नव्हे तर अख्खी मुंबई हादरून गेली आहे.

बाबी दाजी उसरे (वय 72) असं या मयत सासूचं नाव आहे. तर कृष्णा अटनकर (59) असं जावयाचं नाव आहे. कृष्णा हा ड्रायव्हर होता. तो टेम्पो चालवायचा. कृष्णाचा संसार मोडला होता. आपल्या सासूनेच आपला संसार मोडल्याचा त्याच्या मनात राग होता. त्यामुळे त्याने सासूला पेटवून देत स्वत:लाहा पेटवून घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसापूर्वी पहाटे मुलुंडच्या नवघर परिसरात ही घटना घडली आहे.

सासूला भेटायला बोलावलं

कृष्णा आणि त्याच्या पत्नीचे सतत भांडणं होत होती. त्यामुळे रोजच्या कटकटीला वैतागून कृष्णा अटनकरची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यांचा दहा वर्षापूर्वी घटस्फोट झाल्याचीही माहिती आहे. आपली पत्नी सोडून जाण्याला सासू बाबी ही कारणीभूत असल्याने त्याच्या मनात सासूविरोधात राग होता. त्यामुळे त्याने सासू बाबीला मुलुंडच्या मिठागर रोड येथील नाणेपाडा येथे भेटायला बोलावलं. त्यावेळी त्यांच्या वाद सुरू झाले. रस्त्यावर वाद नको म्हणून कृष्णाने सासूला टेम्पोत नेले. त्यानंतर काही समजण्याच्या आतच त्याने बाबीवर लोखंडी हातोडीने वार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाबी रक्तबंबाळ झाली.

अंगावर पेट्रोल ओतलं

बाबी वेदनेने तडपत असतानाच कृष्णाने गाडीतील थिनर आणि पेट्रोल बाबीच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिलं. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कृष्णाने हे पेट्रोल आणि थिनर स्वत:च्या अंगावर ओतून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच मुलुंडच्या नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंदही केली. पण अधिक तपास केल्यानंतर ही हत्याच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांनी अधिक कलमं वाढवली.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....