AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : कुटुंबियांशी भांडून ती घराबाहेर पडली, टॅक्सीत बसली आणि होत्याचं नव्हतं झालं…

कुटुंबियांशी भांडण झाल्यानंतर पीडित मुलगी घराबाहेर पडली. नंतर तिने मालाड येथील तिच्या बहिणीच्या घरी जाण्याचे ठरवले. त्यासाठी ती टॅक्सी शोधत होती. अचानक..

Mumbai Crime : कुटुंबियांशी भांडून ती घराबाहेर पडली, टॅक्सीत बसली आणि होत्याचं नव्हतं झालं...
| Updated on: Sep 21, 2023 | 12:23 PM
Share

मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने मुंबई (mumbai crime) शहर हादरलं आहे. गतिमंद असलेल्या एका 14 वर्षांच्या मुलीवर चालत्या टॅक्सीमध्ये अत्याचार (minor girl abused in taxi) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी चालत्या टॅक्सीत हे घृणास्पद कृत्य केले. त्यानंतर त्यांनी तिला रस्त्याच्या कडेला उतरवून ते तेथून फरार झाले. हा गुन्हा उघडकीस आल्यानंत पोलिसांनी तातडीने तपास करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये टॅक्सी चालकाचाही समावेश आहे. दोघांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी 14 वर्षांच्या या अल्पवयीन मुलीचे तिच्या कुटुंबियांशी काही कारणावरून भांडण झाले होते. त्याच रागात ती घराबाहेर पडली आणि तिने मालाड येथे तिच्या बहिणीच्या घरी जाण्याचे ठरवले. खाली उतरल्यानंतर रस्त्यावर ती टॅक्सी शोधत असताना आरोपीची टॅक्सी तिच्यासमोर आली व ती टॅक्सीत बसून मालाडच्या दिशेने रवाना झाली

टॅक्सीत केला अत्याचार

तिला मालाडमधील मालवणी येथे जायचे होते. टॅक्सी जेव्हा दादरला पोहोचली तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर प्रकाश पांडे याने त्याचा मित्र सलमान ( वय 26) यालाही टॅक्सीत बसवले व त्यांनी पुढला प्रवास सुरू केला. दादर ते सांताक्रूझ दरम्यान सलमान याने त्या अल्पवयीन मुलीवर घृणास्पद अत्याचार केला. ते जेव्हा मालवणी येथे पोहोचले तेव्हा त्यांनी पीडित मुलीला टॅक्सीतून खाली उतरवले आणि ते दोघेही तेथून लगेच फरार झाले. पीडित मुलगी कशीबशी तिच्या नातेवाईकांच्या घरी पोहोचली आणि तिने त्यांना घडलेला सर्व प्रकार कथन केला. त्यांनी लगेचच तिच्या पालकांना याबाबत कळवले तसेच पोलिसांकडे जाऊन घडलेल्या अत्याचाराबाबत सांगून तक्रारही नोंदवली.

दोन्ही आरोपींना अखेर अटक

हे प्रकरण समजल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्या भागातील सीसीटीव्ही फूटेजचा तपास करून आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांतच दोन्ही आरोपींना शोधून काढले आणि त्यांना जेरबंद केले. आरोपी सलमान आणि टॅक्सी ड्रायव्हर प्रकाश पांडे या दोघांनाही अटक करण्यात आली असून सलमानची मदत केल्याचा आरोप प्रकाश याच्यावर लावण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध बलात्कार आणि POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींविरुद्ध पुढील कारवाई सुरू

पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींची देखील वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना