रश्मी शुक्लांच्या चौकशीसाठी मुंबई सायबर पोलिसांची टीम हैदराबादच्या घरी धडकणार?

| Updated on: May 09, 2021 | 8:09 AM

इतकीच गरज असेल तर मला प्रश्न पाठवा, मी उत्तर देते, असे उत्तरही शुक्ला यांनी मुंबई पोलिसांना दिले होते. | rashmi shukla phone tapping

रश्मी शुक्लांच्या चौकशीसाठी मुंबई सायबर पोलिसांची टीम हैदराबादच्या घरी धडकणार?
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला
Follow us on

मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणातील आरोपी IPS अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या चौकशीसाठी मुंबईत यायला तयार नसल्याने आता हैदराबादच्या घरीच जाऊन त्यांची झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई सायबर पोलिसांचे एक पथक हैदराबादला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी किंवा मंगळवारी हे पथक हैदराबादमध्ये रश्मी शुक्ला यांची चौकशी करेल. (Mumbai Police may introgate IPS Rashmi Shukla in hyderabad)

राज्य गुप्तचर विभागाचा गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसात गुन्हा दाखल असून त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीला हजर राहण्यासाठी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र, रश्मी शुक्ला यांनी कोरोना परिस्थितीचे कारण देत मुंबईत येण्यास नकार दिला होता. इतकीच गरज असेल तर मला प्रश्न पाठवा, मी उत्तर देते, असे उत्तरही शुक्ला यांनी दिले होते. मात्र, त्यानंतरही मुंबई पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले होते.

रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात उच्च न्यायालयातही तक्रार दाखल केली होती. चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांनी याचिकेत केला होता. याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि एसपी सायबर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

उच्च न्यायालयात 6 मे रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान रश्मी शुक्ला यांना पुढील सुनावणीपर्यंत अटक करु नका, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, चौकशीवर कोणतेही निर्बंध घालण्यात आले नव्हते. त्यामुळे आता मुंबई सायबर पोलिसांची टीम रश्मी शुक्ला यांच्या घरी धडकण्याची शक्यता आहे.

सीबीआय शुक्लांना साक्षीदार करणार?

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी केला होता. या प्रकरणात सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार आहे. हैदराबादमध्ये रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.

संबंधित बातम्या 

रश्मी शुक्लांकडून सीबीआयकडे ‘या’ दोन नेत्यांची नावं उघड; भाजप नेत्याने वाढवला सस्पेन्स

चौकशीची खूपच घाई असल्यास प्रश्न पाठवा, उत्तरं देते, फोन टॅपिंग प्रकरणी समन्सला रश्मी शुक्लांचं उत्तर

अनिल देशमुख वसुली आदेश प्रकरण, रश्मी शुक्लांचा जबाब नोंद, सीबीआय शुक्लांना साक्षीदार करणार

(Mumbai Police may introgate IPS Rashmi Shukla in hyderabad)