AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल देशमुख वसुली आदेश प्रकरण, रश्मी शुक्लांचा जबाब नोंद, सीबीआय शुक्लांना साक्षीदार करणार

21 एप्रिलला हैदराबादमध्ये रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवल्याची माहिती आहे. (Rashmi Shukla CBI Anil Deshmukh )

अनिल देशमुख वसुली आदेश प्रकरण, रश्मी शुक्लांचा जबाब नोंद, सीबीआय शुक्लांना साक्षीदार करणार
रश्मी शुक्ला, अनिल देशमुख
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 29, 2021 | 9:44 AM
Share

मुंबई : अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचा जबाब नोंदवला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार आहे. हैदराबादमध्ये रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला. (IPS Officer Rashmi Shukla CBI enquiry in Anil Deshmukh alleged extortion case accusation by Param Bir Singh)

सीबीआयने याआधी अनिल देशमुख, त्यांचे दोन पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचे जबाब नोंदवले आहेत. तर निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि त्याच्या दोन वाहन चालकांसह अनेकांचे जबाब रेकॉर्ड करण्यात आले आहेत. 21 एप्रिलला रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवल्याची माहिती आहे.

दोन नेत्यांची नावं उघड?

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारकडून चौकशी होण्यापूर्वीच महाविकासआघाडीचा ‘कार्यक्रम’ उरकून टाकला, असे वक्तव्य भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केले होते. हैदाराबादमध्ये काही दिवसांपूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) रश्मी शुक्ला यांची चौकशी केली. या चौकशीत रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील दोन नेत्यांची नावं उघड केल्याचा गौप्यस्फोट अतुल भातखळकर यांनी केला.

अतुल भातखळकरांचा दावा

भातखळकर यांनी बुधवारी यासंदर्भात ट्विट करुन भाष्य केले होते. त्यामध्ये रश्मी शुक्ला यांनी सीबीआय चौकशीत दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतल्याचा दावा भातखळकर यांनी केला होता. यापैकी एक अनिल म्हणजे देशमुख तर दुसरे अनिल म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचे चेलेचपाटे आणि आणखी एक बडा नेता कोण असावा, याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

चौकशीची खूपच घाई असल्यास प्रश्न पाठवा, उत्तरं देते: रश्मी शुक्ला

एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बुधवार 28 एप्रिल रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना समन्समध्ये सांगण्यात आले होते. रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांना सध्या चौकशीला येऊ शकणार नसल्याचं कळवलं आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता हजेरी शक्य नसल्याचं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांनी दिलेल्या समन्सला दिलं.

महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना मुंबईत चौकशीला हजर राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असं रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला सांगितलं.

रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

संबंधित बातम्या 

रश्मी शुक्लांकडून सीबीआयकडे ‘या’ दोन नेत्यांची नावं उघड; भाजप नेत्याने वाढवला सस्पेन्स

चौकशीची खूपच घाई असल्यास प्रश्न पाठवा, उत्तरं देते, फोन टॅपिंग प्रकरणी समन्सला रश्मी शुक्लांचं उत्तर

(IPS Officer Rashmi Shukla CBI enquiry in Anil Deshmukh alleged extortion case accusation by Param Bir Singh)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...