तब्बल 1800 किलो गांजा जप्त, ड्रग्ज तस्करीचा छडा लागण्याची शक्यता

| Updated on: Feb 13, 2021 | 1:30 PM

विक्रोळी परिसरात पोलिसांनी तब्बल 1800 किलो गांजा जप्त केला. (Mumbai Police cannabis)

तब्बल 1800 किलो गांजा जप्त, ड्रग्ज तस्करीचा छडा लागण्याची शक्यता
पोलिसांनी एकूण 1800 किलो गांजा जप्त केला.
Follow us on

मुंबई : तस्करीसाठी नेला जाणारा तब्बल 1800 किलो गांजा पोलिसांनी जप्तआहे. मुंबई पोलिसांनी विक्रोळी परिसरात 12 फेब्रुवारी रोजी ही कारवाई केली असून पकडलेल्या या गांजीची किंमत तब्बल 3 कोटी रुपये आहे. या कारवाईची अधिकृत माहिती सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. पोलिसांच्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Mumbai Police have seized 1800 kg of cannabis in Vikhroli area)

1800 किलो गांजा जप्त

मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 फेब्रुवारी रोजी विक्रोळी परिसरात गांजाची तस्करी केली जात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी येथे सापळा रचत तब्बल 1800 किलो गांजा जप्त केला. या गांजाची किंमत बाजारमूल्यानुसार 3 कोटी रुपये आहे. पोलिसांनी आपल्या कारवाई दरम्यान दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. त्यांची नांव अनुक्रमे यादव आणि सोनवणे असे आहे. प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार हे आरोपी ओडिसामधून गांजा आणायचे. ओडिसा येथून गांजा आणल्यानंतर ते भिवंडी येथील गोदामात हा गांजा ठेवायचे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप सातपुते हा फरार आहे.

दर महिन्याला महाराष्ट्रात 5 टन गांजा

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींकडून बडे खुलासे होत आहेत. ड्रग्ज तस्करीचे अनेक धागे पोलिसांच्या हाती लागत आहेत. या तस्करांकडून महिन्याला 5 टन गांजा महाराष्ट्रात आणला जायचा. तसेच, तो मुंबईतून पुणे, सोलापूर अशा शहरांत वितरित केला जायचा. ओडीसा राज्यातील लक्ष्मी प्रधान हा मुख्य तस्कर सातपुते, सोनवणे आणि फरार झालेला संदीप सातपुते यांना गांजाचा पुरवठा करायचा. सुरुवातीला ओडीसा येथून गांजा घेतल्यानंतर हे ड्रग्ज तस्कर गांजाला आंध्र प्रदेशमध्ये काही काळासाठी ठेवायचे. नंतर आंध्र प्रदेशमधून हा गांजा महाराष्ट्रात आणला जायचा. पोलिसांनी सांगितल्याप्रणाणे नंतर हा गांजा मुंबई, पुणे आणि सोलापूर अशा प्रमुख शहरांत उतरवण्यात येत होता.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करी संबंधात एकूण 32 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पकडण्यात आलेल्या गांजाची किंमत तब्बल पंधरा कोटी आहे. ड्रग्ज तस्करीचे हे रॅकेट समोर आल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

चाकणमध्ये दीड लाखांचा गुटखा जप्त, 100 दिवसांत 5 कोटींचा मुद्देमाल आणि 500 गुन्हे दाखल, कृष्णप्रकाश यांचा दणका!

Rinku Sharma Murder | ज्याच्या पत्नीला रिंकू शर्माने रक्त दिलं, त्यानेच जीव घेतला

धक्कादायक ! मॅनहोलमध्ये लपलंय काय? तब्बल 21 लाखांचं सोनं, पोलीसही हैराण

(Mumbai Police have seized 1800 kg of cannabis in Vikhroli area)