लस येण्यापूर्वीच चिनी हॅकर्सचा डोळा; बनावट लसीची भीती, मुंबई पोलीस सतर्क

| Updated on: Dec 24, 2020 | 2:06 PM

आगामी काही दिवसातच कोरोनाची लस येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने संपूर्ण राज्यात जय्यत तयारी सुरू केली आहे. (mumbai police on corona vaccine black marketing)

लस येण्यापूर्वीच चिनी हॅकर्सचा डोळा; बनावट लसीची भीती, मुंबई पोलीस सतर्क
Follow us on

मुंबई: आगामी काही दिवसातच कोरोनाची लस येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने संपूर्ण राज्यात जय्यत तयारी सुरू केली आहे. मात्र, या कोरोना लसीवर चीन आणि कोरियाच्या हॅकर्सचा डोळा असल्याचं उघड झालं आहे. या हॅकर्सकडून बाजारात बनावट कोरोना लस आणल्या जाऊ शकत असल्याने मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. (mumbai police on corona vaccine black marketing)

कोरोना लस आल्यानंतर या लसीचा काळाबाजार होऊ शकतो, त्यामुळे पोलिसांनी मुंबईकरांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. चीन आणि कोरियाचे सायबर हॅकर्स या कोरोना लसीचा काळाबाजार करू शकतात. त्याला नागरिकांनी बळी पडू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. डार्क नेटच्या माध्यमातून चीन आणि कोरियाचे हॅकर्स लसीचा काळाबाजार करू शकतात. कोरोना लस बनविणाऱ्या विविध कंपन्यांचा डाटा हॅक करून त्याद्वारे हे हॅकर्स बनावट लस बनवू शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे. इंटरपोलने याबाबत अॅलर्ट जारी केला असून सर्वांनी सावधानता बाळगावी, असं आाहन पोलीस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) यशस्वी यादव यांनी केलं आहे.

मुंबईत ‘या’ 8 रुग्णालयात लस टोचली जाणार

कोरोनाच्या लसीकरणासाठी पालिका क्षेत्राच्या कृती दलाची म्हणजेच टास्क फोर्सची पहिली बैठक पार पडल्यानंतर लसीकरणासाठीची कार्यवाही जलद गतीने सुरु आहे. प्रारंभी लसीकरणासाठी परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही ८ लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत. या ठिकाणी रुग्णांना लस टोचली जाणार आहे. (mumbai police on corona vaccine black marketing)

दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळून आली आहे. या जीवघेण्या कोरोनामुळे संपूर्ण जगभर खळबळ उडाली असून अनेक देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनसह अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी नागरिकांना सतर्क राहण्यासाठी काही सूचनाही केल्या आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रारंभ हा लंडनमध्ये झालेला आहे. इंग्लंडमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या केसेस आपल्याला ऐकायला मिळत आहेत. म्हणजे संख्यात्मक विचार केला तर एका दिवसांमध्ये जवळजवळ 32 हजार नवे रुग्ण आढळून येत असून ही लक्षणीय बाब होती. कोरोनाचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरण्याचा जो संभव आहे, त्याची या उपप्रकारामध्ये 70% ॲक्टिव्हिटी अधिक आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली असून त्यासाठीच सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, असं डॉ. ओक यांनी सांगितलं. (mumbai police on corona vaccine black marketing)

 

संबंधित बातम्या:

केईएम, शीव, कूपर, नायरसह 8 ठिकाणी लसीकरण केंद्रे; वाचा मुंबईत कुठे, कसे होणार लसीकरण!

कोरोनाच्या नव्या घातक प्रजातीवर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, युरोपीय देशांना विशेष सूचना

नव्या कोरोना लसीचा धसका?, थांबा..! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला बघा, निर्णय घ्या!

(mumbai police on corona vaccine black marketing)