धक्कादायक, PF च्या पैशाच्या मोबदल्यात मॅनेजरची मुलीकडे सेक्सची मागणी, मुंबईतील घटना

पीएफवर क्लेम करण्यासाठी वेगवेगळे फॉर्म भरुन दिले. पण पीएफची रक्कम मिळाली नाही. चौकशी केल्यानंतर कंपनीच्या एचआर मॅनेजरकडे माझी फाईल असल्यास समजलं.

धक्कादायक, PF च्या पैशाच्या मोबदल्यात मॅनेजरची मुलीकडे सेक्सची मागणी, मुंबईतील घटना
crime news
| Updated on: Mar 22, 2024 | 12:40 PM

वांद्रे पूर्वेला राहणाऱ्या एका 23 वर्षीय महिलेने खासगी कंपनीच्या HR मॅनेजर विरोधात पोलीस तक्रार नोंदवली आहे. मृत वडिलांच्या प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे रिलीज करण्याच्या मोबदल्यात एचआर मॅनेजरने सेक्सची मागणी केली. माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड विधान संहितेच्या विविध कलमातंर्गत खेरवाडी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पण अजून आरोपीला अटक केलेली नाही.

तक्रारदार मुलगी घरकाम करते. ती आपला छोटा भाऊ आणि आजीसोबत राहते. तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. वडिलांच 2015 साली निधन झालं. त्यावेळी ती 15 वर्षांची होती. वडिलांच्या कंपनीने त्यांचा PF कापला होता. वडिलांनी तिला नॉमिनी ठेवलं होतं. 18 वर्ष वयाची झाल्यानंतर तिला ती PF ची रक्कम मिळणार होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

क्लेम करण्यासाठी वेगवेगळे फॉर्म भरले, पण….

पीएफवर क्लेम करण्यासाठी वेगवेगळे फॉर्म भरुन दिले. पण पीएफची रक्कम मिळाली नाही. चौकशी केल्यानंतर कंपनीच्या एचआर मॅनेजरकडे माझी फाईल असल्यास समजलं. मी एचआर मॅनेजरशी संपर्क साधल्यानंतर त्याने फंड रिलीज करण्याच्या बदल्यात शरीरसंबंधांची मागणी केली. त्यानंतर वांद्रे पूर्वला राहणाऱ्या या मुलीने खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.