‘तू काळी जादू करतो…’ संशयावरुन आधी गळा दाबला, नंतर प्रायव्हेट पार्ट कापून..

एका तरुणाची जादूटोणा केल्याच्या संशयातून निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हल्लेखोरांनी या तरुणाचा गळा दाबून त्याला ठार केले नंतर प्रायव्हेट पार्ट कापला आणि त्याला कालव्यात टाकले

‘तू काळी जादू करतो…’  संशयावरुन आधी गळा दाबला, नंतर प्रायव्हेट पार्ट कापून..
Crime news
| Updated on: Aug 04, 2025 | 8:36 PM

ओदीशाच्या गजपती जिल्ह्यात हृदयात धडकी भरवणारा प्रकार घडला आहे. येथे एका ३५ वर्षांच्ंया तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ३५ वर्षांच्या तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याचा मृतदेह हरभंगी डॅममध्ये टाकून दिला आहे.पोलिसांना संशय आहे की जादूटोणा केल्याच्या आरोपावरुन हा प्रकार झाला आहे. पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमार्टेमसाठी पाठवून देण्यात आले आहे.

ही घटना मोहना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलासापदर गावातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी तलावात एका तरुणाचा मृतदेह तरंगताना पाहीला. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटना स्थळी पंचनामा करुन मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला. पोलिस अधिकारी सुरेश चंद्र त्रिपाठी यांनी सांगितले की या प्रकरणात १४ गावकऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु झाली आहे.प्राथमिक तपासात मयतावर गावातील लोकांचा तो काळी जादू करीत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

युवकावर करत होते संशय

गावात दोन आठवड्यानंतर एक महिला संशयात परिस्थितीत मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी या तरुणाला दोषी ठरवले होते. या महिलेचा मृत्यू या तरुणाच्या काळ्या जादूनेच झाल्याचा सर्वांना संशय होता. या अंधविश्वास आणि भीतीमुळे हा तरुण आणि त्याचे कुटुंबिय गाव सोडून गंजम जिल्ह्यात त्याच्या मामाकडे राहायला गेले. परंतू त्यांनी त्याच्या वहिणीला पाळीव प्राण्यांच्या देखभालीसाठी गावीच ठेवले होते.

हरभंगी कालव्यात फेकला मृतदेह

शनिवारी तो आपल्या गुरांना घेण्यासाठी गावी आला तेव्हा लोकांनी त्याला घेरले. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार आधी त्याचे अपहरण केले. आणि नंतर त्याचा गळा दाबून खून केला गेला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून शव हरभंगी कालव्यात फेकून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावकऱ्यामध्ये जादूटोणाबाबत असलेल्या अंधविश्वासाने ही निर्घृण हत्या झाली आहे.सध्या पोलिसांनी सर्व संशयितांची चौकशी करीत आहे.प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.