मुस्लीम युवतीला आवडला हिंदू धर्म, प्रियकरासोबत मुस्लीम पतीला सोडून झारखंडवरून आली बिहारला

दोघेही गोड्डा न्यायालयात पोहचून वकिलाला भेटले. युवतीच्या कुटुंबीयांनी न्यायालय परिसरात युवतीला मारहाण केली.

मुस्लीम युवतीला आवडला हिंदू धर्म, प्रियकरासोबत मुस्लीम पतीला सोडून झारखंडवरून आली बिहारला
राम कुमार आणि मुस्कानची अनोखी प्रेमकहाणी
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 6:23 PM

भागलपूर – एका मुस्लीम युवतीनं हिंदू धर्माच्या युवकासोबत लग्न केलं. ही मुस्लीम युवती झारखंड जिल्ह्यातील मेहरमा ठाकूरगगंटी भागातील सीआरडीह येथील रहिवासी आहे. मेहरमा कसबा येथील एका हिंदू युवकासोबत लग्न केलं. या युवतीनं लग्न दोन वर्षांपूर्वीच मुस्लीम युवकासोबत केलं होतं. परंतु, ती हिंदू युवकाच्या प्रेमात पडली होती. घरच्यांनी तीचं लग्न जातीतील युवकासोबत लावून दिलं होतं. पण, लग्नानंतरही युवतीला तिचा हिंदू प्रियकरचं आवडत होता.

हिंदू युवकही तिच्याशिवाय राहू शकत नव्हता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी झारखंडमधून पळ काढत बिहार गाठलं. मुस्लीम युवतीनं हिंदू धर्मीय युवकासोबत लग्न केलं. या तिच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला. पहिल्यांदा तीनं हिंदू धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांनी हिंदू पद्धतीनं लग्न केलं.

राम कुमार आणि मुस्कान यांची प्रेमकहाणी चर्चेत आली. दोघेही घरून निघाले. दोघेही गोड्डा न्यायालयात पोहचून वकिलाला भेटले. युवतीच्या कुटुंबीयांनी न्यायालय परिसरात युवतीला मारहाण केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी युवतीला सुरक्षा पुरविली. युवती म्हणाली मी माझ्या मर्जीनं लग्न करत आहे.

मुस्काननं आपल्या प्रियकरासोबत भागलपूरच्या पीरपती येथील एका मंदिरात हिंदू धर्म स्वीकारून लग्न केलं. तीनं सांगितलं की, माझ्या कुटुंबीयांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर युवतीला सुरक्षा पुरविण्यात आली.

युवतीचे कुटुंबीय तिला धमकी देत होते. पण, ती त्यांना घाबरली नाही. मुस्कान म्हणाली, मी हिंदू धर्मात आल्यानं खूश आहे. आता ती हिंदू धर्मालाच आपलं माननार. आपल्या हिंदू पतीसोबत राहील.

राम कुमार म्हणाला, आम्ही दोघेही एकदुसऱ्यासोबत प्रेम करत होतो. पण, मुस्कानचं लग्न तिच्या कुटुंबीयांनी तिच्या मर्जीविरोधात लावून दिलं होतं. मुस्कान त्याच्याकडं खूश नव्हती. त्यामुळं त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.