तुम्हाला जास्त परताव्याचे आमिष दाखवतात का?; मग सावध राहा कारण…

| Updated on: Mar 09, 2023 | 9:52 AM

साडेपाच कोटी रुपयांचे दागिने तसेच एक कोटी एकवीस लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. याच प्रकरणात नागपुरातील अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक झाली.

तुम्हाला जास्त परताव्याचे आमिष दाखवतात का?; मग सावध राहा कारण...
Follow us on

नागपूर : नागपुरातील व्यापाऱ्यांची ईडीकडून पुन्हा झाडाझडती सुरूच आहे. नागपुरात शुक्रवारी पंकज मेहाडिया आणि त्याच्या काही सहकाऱ्यांच्या ठिकाणांवर गुंतवणूक घोटाळ्या संदर्भात ईडीची कारवाई झाली होती. त्याच प्रकरणात काल ईडीच्या पथकाने नागपुरात काही व्यापाऱ्यांचे बयान नोंदवून घेतले आहे. शुक्रवारी ईडीची कारवाई नागपुरात होत असताना या गुंतवणूक घोटाळ्याशी संबंधित काही व्यापारी नागपुरात नव्हते. त्यामुळे त्यांचे बयान काल नोंदवून घेण्यात आल्याची माहिती आहे. शुक्रवारी ईडीच्या विविध पथकांनी नागपुरात पंकज मेहाडिया याचे कार्यालय तसेच घरावर कारवाई करण्यात आली.

इतक्या कोटींचे दागिने जप्त

साडेपाच कोटी रुपयांचे दागिने तसेच एक कोटी एकवीस लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. याच प्रकरणात नागपुरातील अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक झाली. जास्त परताव्याचे आमिष दाखवून पंकज मेहाडिया याने अनेक व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये घेऊन विविध ठिकाणी नियम बाहेर पद्धतीने गुंतवल्याचा आरोप आहे. काही व्यापाऱ्यांनी पंकज मेहाडियाच्या माध्यमातून जाणूनबुजून त्यांचा काला धन विविध व्यवसायांमध्ये गुंतवल्याची ईडीला शंका आहे. त्याच अनुषंगाने ईडीची ही कारवाई होत आहे.

याठिकाणी मारण्यात आल्या धाडी

ईडीने ३ मार्च रोजी नागपुरात १७ ठिकाणी छापेमारी केली. स्टील, लोहा उद्योगातील गुंतवणूकदार ईडीच्या रडारवर होते. व्यापाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली. अनेकांची फसवणूक करणाऱ्या पंकज मेहाडियाच्या घराचीही झाडाझडती घेण्यात आली. आर संदेश गृपवरही ईडीने धाडी मारल्या. संदेश गृपचे बांधकाम आणि औषध यासह अनेक क्षेत्रात गुंतवणूक आहे. रामदेव अग्रवाल याच्या घर आणि कार्यालयावरही धाडी मारण्यात आल्या. संदेश इंफ्रास्ट्रक्टर प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयातही शोध मोहीम घेतली.

ठगबाज पंकज मेहाडिया

पंकज मेहाडिया हा नागपूरमधील ठगबाज म्हणून ओळखला जातो. तो नागपूरच्या रामदासपेठ भागात राहतो. त्याच्या आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हे अन्वेषण शाखेच्या आर्थिक विभागाने यापूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखला केला आहे. २०२१ मध्ये त्याला अटक करून तुरुंगातही पाठवण्यात आले होते.