विद्यार्थ्याला बँकेतील कॅशिअरने दिल्या बनावट नोटा, बँकेतील कर्मचाऱ्याचं संशयास्पद वागणे ?

| Updated on: Aug 12, 2023 | 11:38 AM

एका विद्यार्थ्यांला बँकेतील कॅशिअरने बनावट नोटा दिल्या. त्यानंतर पोलिस चौकशी न करणे अंगलट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचं वागणं संशयास्पद असल्याचं विद्यार्थ्याने सांगितलं आहे.

विद्यार्थ्याला बँकेतील कॅशिअरने दिल्या बनावट नोटा, बँकेतील कर्मचाऱ्याचं संशयास्पद वागणे ?
tumsar bank brach
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भंडारा : जिल्ह्यात (bhandara news in marathi) काल एक तिथल्या नागरिकांच्या बाबतीत धक्कादायक गोष्ट घडली आहे. बँकेतील कॅशिअरने (indian overseas bank) एका विद्यार्थ्याला बनावट नोट दिली होती. हे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्याला ती नोट बदलून देण्यात आली. परंतु काहीच कसलीचं कारवाई न केल्यामुळे कर्मचारी संशयात सापडले आहेत. या घटनेनंतर त्यांना पोलिस (bhandara police) कारवाई अपेक्षित होती. ज्यावेळी ही गोष्ट व्हायरल झाली, त्यावेळी बँकेतील कर्मचाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

बँकेतून मिळाल्या 100 रूपयांच्या बनावट नोटा….

तुमसर शहरातील इंडियन ओवरसीज बँकतून10 हजार रुपये काढले. त्यामध्ये चार शंभराच्या नोटा बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुमसर येथील साई महाविद्यालयातील विद्यार्थी असून त्यानं प्रवेश फी भरण्यासाठी इंडियन ओवरसीज बँकेतील आपल्या खात्यामधून पैसे काढले. ज्यावेळी त्याने शाळेत ते पैसे शुल्क म्हणून जमा केले. त्यावेळी हा प्रकार शाळा प्रशासनाच्या लक्षात आला.

भंडाऱ्याच्या तुमसरच्या इंडियन ओव्हरसीज बँकेतील प्रकार

त्यानंतर शाळेतील कर्मचारी विद्यार्थ्यासह बँकेत गेला. तिथल्या मॅनेंजर आणि कॅशिअरने काहीतरी उत्तर देऊन नोटा बदलून दिल्या. मात्र पोलिसांना ही बाब कळविली नाही. बनावट नोटा सापडल्याने आता पोलिस कारवाई होईल अशी शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्याला अपेक्षा होती. परंतु बँकेतील कर्मचाऱ्यांनी काहीचं न केल्यामुळे त्यांच्यावरती संशय बळावला आहे. या संपूर्ण प्रकरणाची भागात चर्चा सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणाबाबत पत्रकार आणि काही जाणकार लोकांनी बँक मॅनेंजर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी या प्रकरणावरती बोलण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली आहे.