VIDEO | रेशन कार्डवरुन वाद, नायब तहसीलदारांना महिलेची कार्यालयातच मारहाण

| Updated on: Jul 06, 2021 | 2:32 PM

संबंधित महिला ही अमरावतीतील भातकुलीच्या तहसील कार्यालयात गेली होती. यावेळी नायब तहसीलदार विजय मांजरेंनी तिच्याकडे रेशन कार्ड संदर्भात विचारणा केली. त्यातूनच या महिलेने थेट नायब तहसीलदारांना मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.

VIDEO | रेशन कार्डवरुन वाद, नायब तहसीलदारांना महिलेची कार्यालयातच मारहाण
नायब तहसीलदारांना महिलेचा कार्यालयातच मारहाण
Follow us on

अमरावती : नायब तहसीलदारांना एका महिलेने त्यांच्या कार्यालयातच चोप दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेशन कार्ड लवकर तयार करून दिले नसल्याच्या कारणावरुन ही मारहाण झाल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील भातकुली तहसीलमध्ये घडली आहे. (Deputy Tehsildar allegedly beaten up by lady after fight over Ration Card)

नेमकं काय घडलं

विजय मांजरे असे मारहाण झालेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. ते भातकुली तहसीलमध्ये कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण करणाऱ्या महिलेचे रेशन कार्ड संदर्भात काम होते. याच कामातून हा वाद समोर आला आहे.

रेशन कार्डवरुन वाद

संबंधित महिला ही भातकुलीच्या तहसील कार्यालयात गेली होती. यावेळी मांजरेंनी तिच्याकडे रेशन कार्ड संदर्भात विचारणा केली. त्यातूनच या महिलेने थेट नायब तहसीलदारांना मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.

नायब तहसीलदारांची पोलिसात धाव

दरम्यान या प्रकरणी भातकुलीचे नायब तहसीलदार विजय मांजरे यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | मद्यधुंद तरुणांची फ्री स्टाईल हाणामारी, भंडारा शहरात भरचौकात ढिशूम-ढिशूम

VIDEO | पिंपरीत कोयता उगारुन गावगुंडांची नागरिकांना मारहाण, त्याच रस्त्यावर पोलिसांकडून आरोपींची धिंड?

(Deputy Tehsildar allegedly beaten up by lady after fight over Ration Card)