VIDEO | पिंपरीत कोयता उगारुन गावगुंडांची नागरिकांना मारहाण, त्याच रस्त्यावर पोलिसांकडून आरोपींची धिंड?

दोन दिवसांपूर्वी पिंपळे निलखच्या ज्या रस्त्यावर दारु पिऊन प्रतीक खरात, चेतन जावरे यांनी सर्वसामान्यांना वेठीस धरून कोयत्याने मारहाण केली होती, त्याच रस्त्यावर सोमवारी सांगवी पोलिसांनी या दोन्ही आरोपीची धिंड काढून चांगलाच धडा शिकवला

VIDEO | पिंपरीत कोयता उगारुन गावगुंडांची नागरिकांना मारहाण, त्याच रस्त्यावर पोलिसांकडून आरोपींची धिंड?
(डावीकडे) कोयता हल्ल्याची घटना, (उजवीकडे) पोलिसांनी धिंड काढल्याचा व्हिडीओ

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे निलख परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना हातात कोयता घेऊन मारहाण करणाऱ्या गाव गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. जिथे ही घटना घडली, त्याच रस्त्यावर सांगवी पोलिसांनी दोन्ही आरोपींची धिंड काढल्याचं समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची धिंड काढल्याचा आरोप याआधीही झाला होता. (Pimpri Chinchwad Crime Pune Sangvi Police allegedly made Goons Parade on road)

दोन दिवसांपूर्वी पिंपळे निलखच्या ज्या रस्त्यावर दारु पिऊन प्रतीक खरात, चेतन जावरे यांनी सर्वसामान्यांना वेठीस धरून कोयत्याने मारहाण केली होती, त्याच रस्त्यावर सोमवारी सांगवी पोलिसांनी या दोन्ही आरोपीची धिंड काढून चांगलाच धडा शिकवला. मात्र सांगवी पोलिसांशी संपर्क साधला असता त्या आरोपींना घेऊन घटनास्थळ पाहण्यासाठी गेलो असता कुणी तरी व्हिडीओ तयार केला, असा दावा करण्यात आला.

पोलिसांनी धिंड काढतानाचा व्हिडीओ :

काय आहे प्रकरण?

पिंपरी चिंचवडच्या पिंपळे निलख भागात मद्यधुंद अवस्थेतील दोन युवकांनी दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमाराला रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांच्या गाड्या अडवून त्यांच्यावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. प्रतीक संतोष खरात आणि चेतन जावरे अशी या हल्लेखोर तरुणांची नावे आहेत. विशेष म्हणजे त्या दोन तरुणांपैकी एका तरुणाच्या हातात कोयता होता. त्यांनी अनेक गाड्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट झालं आहे.

एक व्यक्तीने या दोन तरुणांचा हा प्रताप मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर पोलिसांनी या हल्लेखोरांना अटक केली होती. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या आरोपींनी त्या दिवशी ज्या नागरिकांना त्रास दिला असेल त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहनही सांगवी पोलिसानी केले आहे.

मारहाण करतानाचा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची पुण्यात पोलिसांकडून धिंड?

(Pimpri Chinchwad Crime Pune Sangvi Police allegedly made Goons Parade on road)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI