AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : उधारीचे पैसे मागितले म्हणून हॉटेल मालकावर हल्ला, नागपुरात चाललंय काय?

तो नियमित हॉटेलमध्ये यायचा आणि जेवण करुन जायचा. मात्र उधारी वाढत चालल्याने हॉटेल मालकाने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. यानंतर जे घडलं त्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Nagpur Crime : उधारीचे पैसे मागितले म्हणून हॉटेल मालकावर हल्ला, नागपुरात चाललंय काय?
उधारीचे पैसे मागितल्याने हॉटेल मालकावर हल्लाImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 26, 2023 | 12:12 PM
Share

नागपूर / 26 ऑगस्ट 2023 : हॉटेल मालकाने उधारीचे पैसे मागितले म्हणून त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात हॉटेल मालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी हॉटेल मालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपुरच्या गणेशपेठ परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. ही सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ललित अग्नीहोत्री असे अटक आरोपीचे नाव आहे. भरबाजारात घडलेल्या या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

काय आहे प्रकरण?

गणेशपेठ बसस्थानक परिसरात असलेल्या अंबिका हॉटेलमध्ये आरोपी ललित नियमित जेवायला यायचा. यामुळे पीडित हॉटेल मालक आणि आरोपी एकमेकांना ओळखायचे. आरोपी कधी पैसे द्यायचा, तर कधी उधारी ठेवायचा. ललितची उधारी वाढत चालली होती. यामुळे हॉटेल मालकाने त्याच्याकडे उधारीबाबत विचारणा केली. यामुळे ललित चिडला आणि त्याने हॉटेल मालकाला धमकी देत त्याच्या धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात हॉटेल मालक गंभीररित्या जखमी झाला.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे हॉटेलमधील कर्मचारी, ग्राहक सर्वांनाच धक्का बसला. घटनेनंतर आरोपी पळून गेला. जखी मालकाला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे. गणेशपेठ बस स्थानक परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. लोकांची वर्दळ सुद्धा त्या ठिकाणी मोठी असते. या घटनेनंतर मात्र परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल