दोन ट्रकची धडक, चंद्रपूर शहराजवळ भीषण अपघात, आग भडकून जंगलातील झाडंही विळख्यात

| Updated on: May 20, 2022 | 7:19 AM

चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ 2 ट्रकमध्ये भीषण अपघात झालाय. अपघातानंतर भीषण आग लागली आहे. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून ही आग आणखी भडकली आहे.

दोन ट्रकची धडक, चंद्रपूर शहराजवळ भीषण अपघात, आग भडकून जंगलातील झाडंही विळख्यात
चंद्रपुरात भीषण अपघात
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

चंद्रपूर : दोन ट्रकची धडक होऊन चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ भीषण अपघात (Chandrapur Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातानंतर मोठी आगही लागली. आग लागल्यामुळे ट्रकचे टायर फुटून आग (Fire) अधिकच भडकली. अपघातात दोन्ही ट्रकच्या चालक-वाहकांचं (Truck Accident) काय झालं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान आग संपूर्ण रस्ताभर पसरल्यामुळे वाहतूक काही काळ खंडित करण्यात आली होती. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आगीच्या उंच ज्वाळांनी लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडली.

नेमकं काय घडलं?

चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ 2 ट्रकमध्ये भीषण अपघात झालाय. अपघातानंतर भीषण आग लागली आहे. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून ही आग आणखी भडकली आहे.

हे सुद्धा वाचा

जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात

संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने वाहतूक खंडित झाली. आगीच्या उंच ज्वाळानी लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडली आहेत. मूल-चंद्रपूर येथून अग्निशमन पथके रवाना करण्यात आली असून मूल-रामनगर पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.

महामार्गावर वाहतूक खंडित

महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दोनपैकी एका ट्रकमध्ये लाकूड असल्याची माहिती असून या आगीत चालक-वाहकांचे काय झाले याबाबत अद्याप स्पष्टता नाही.