गर्भवती विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, पोटावर बॅग मारल्याने गर्भपात, अमरावतीत खळबळजनक प्रकार

| Updated on: Feb 21, 2022 | 8:19 AM

हुंड्यासाठी पतीच्या शिवाय सासरच्या इतर चार जणांनी पीडित महिलेचा छळ केल्याचा आरोप केला जात आहे. तिच्या पोटावर बॅग मारल्याने तिचा गर्भपात देखील झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

गर्भवती विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, पोटावर बॅग मारल्याने गर्भपात, अमरावतीत खळबळजनक प्रकार
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

अमरावती : हुंड्यासाठी (Dowry) छळ करत गर्भवती विवाहितेच्या (Pregnant Lady) पोटावर बॅग मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावती शहरातील (Amravati Crime) पांढुरणा भागात ही घटना घडल्याची माहिती आहे. लग्नानंतर जेमतेम दीड महिन्यात हा प्रकार घडला आहे. पतीशिवाय सासरच्या चौघा जणांनी पीडित महिलेचा छळ केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे पोटावर बॅग मारल्याने महिलेचा गर्भपात झाल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक कलहातून अमरावतीच्या धारणीमध्ये एका विवाहितेला तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी डिझेल टाकून जिवंत पेटवून दिल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा हुंड्यासाठी एका गर्भवती महिलेचा छळ झाल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातच समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

हुंड्यासाठी पतीच्या शिवाय सासरच्या इतर चार जणांनी पीडित महिलेचा छळ केल्याचा आरोप केला जात आहे. तिच्या पोटावर बॅग मारल्याने तिचा गर्भपात देखील झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

माहेरुन पैशांसाठी तगादा

अमरावती शहरातील शेगांव नाका भागात राहणाऱ्या या तरुणीचा विवाह पाच जानेवारीला पांढुरणा येथील युवकासोबत पार पडला होता. विवाहानंतर ही तरुणी तिच्या सासरी पांढुरणा येथे राहत होती. यावेळी पतीसह सासरच्या मंडळींनी घरात वस्तू आणण्यासाठी तिला माहेरुन पैसे आणण्यास तगादा लावला होता. एकदा तर पती घरी नसताना दिराने विनयभंग केल्याचंही पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

पोटावर बॅग मारुन गर्भपात

अखेर हुंड्यासाठी छळ करत गर्भवती विवाहितेच्या पोटावर बॅग मारण्यात आली. पोटावर बॅग मारल्याने महिलेचा गर्भपात झाला. लग्नानंतर जेमतेम दीड महिन्यात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती, दीर यांच्यासह एकूण पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेच्या छळाची पुनरावृत्ती

कौटुंबिक वादातून अमरावतीच्या धारणीमध्ये विवाहित महिलेला पती आणि तिच्या सासरच्या मंडळींनी डिझेल टाकून जिवंत जाळल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. त्यानंतर काही दिवसांतच हुंड्यासाठी एका गर्भवती महिलेचा छळ झाल्याचा प्रकार त्याच जिल्ह्यात उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.

संबंधित बातम्या :

चार महिने भावासोबत राहिली, तीन दिवसांपूर्वीच सासरी परतली, पतीकडून विवाहितेची निर्घृण हत्या

सासरी विवाहितेकडे केलेली कोणतीही भौतिक मागणी हुंडाच, सुप्रीम कोर्टाचं मत, हायकोर्टाने सोडलेल्या पती-सासऱ्याला सश्रम कारावास

हुंड्यात बुलेटची मागणी, विवाहितेचा छळ ; नऊ जणांविर गुन्हा