Murder | सोयरिकीतील मध्यस्थाकडून वधूपित्याचा खून, बुलडाण्यातील हत्येचं गूढ उकललं

| Updated on: Apr 15, 2022 | 12:40 PM

मुलीच्या लग्नाची मध्यस्थी आणि सोयरीक का केली म्हणून तक्रारदार महिलेचा पती विनोद इंगळे हा सावरगाव डुकरे येथे येऊन बुद्धभूषण साहेबराव डोंगरे याच्याशी वाद घालत होता. यावेळी बुद्धभूषण डोंगरदिवे याने तिच्या पतीला मारहाण केली

Murder | सोयरिकीतील मध्यस्थाकडून वधूपित्याचा खून, बुलडाण्यातील हत्येचं गूढ उकललं
संपत्तीच्या वादातून काकांनीच पुतण्याला 11 वेळा भोसकले
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

बुलडाणा : सोयरिकीतील मध्यस्थानेच मुलीच्या पित्याचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील मालगणी शिवारात (Buldana Crime) एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. शिवारात मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विनोद पंढरी इंगळे असं 50 वर्षीय मयत व्यक्तीचं नाव आहे. मयत व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारीनुसार आरोपी बुद्धभूषण डोंगरदिवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वधूपित्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

हत्येची घटना 13 एप्रिलच्या रात्री 10 ते 11 वाजताच्या दरम्यान घडली होती. या प्रकरणी चिखली पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणी फिर्यादी ज्योती विनोद इंगळे (रा. डोंगरशेवली, हल्ली मुक्काम सावरगाव डुकरे तालुका चिखली) यांनी फिर्याद दिली होती.

काय आहे प्रकरण?

पती विनोद पंढरी इंगळे (वय 50 वर्ष, रा. डोंगरशेवली तालुका चिखली) यांच्या त्रासाला कंटाळून ज्योती इंगळे ही सावरगाव डुकरे येथे तिच्या मामाकडे राहत होती. तिच्या मुलीचे लग्न सावरगाव डुकरे येथीलच आरोपी बुद्धभूषण साहेबराव डोंगरदिवे याच्या मध्यस्थीने झाले.

दगडाने ठेचून हत्या

मुलीच्या लग्नाची मध्यस्थी आणि सोयरीक का केली म्हणून तिचा पती विनोद इंगळे हा सावरगाव डुकरे येथे येऊन बुद्धभूषण साहेबराव डोंगरे याच्याशी वाद घालत होता. यावेळी बुद्धभूषण डोंगरदिवे याने तिच्या पतीला मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याची फिर्याद महिलेने दिली.

चिखली पोलिसांनी यानुसार कारवाई करत आरोपी बुद्धभूषण डोंगरदिवे याला ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पीएसआय श्रीराम व्यवहारे, धनंजय इंगळे आणि पोलीस कर्मचारी करत आहेत.

संबंधित बातम्या :

Sanjay Biyani Murder | संजय बियाणींच्या हत्येमागे रिंदाचा हात आहे का? पोलिसांचा अंतिम निष्कर्ष

Pune Murder | चारित्र्याच्या संशयातून पुण्यात 23 वर्षीय पत्नीची हत्या, साताऱ्याला पळून जाताना नवरा अटकेत

गाय धुतल्यानंतर पाणी आवारात शिरल्याने वाद, तिहेरी कुटुंबाला शेजाऱ्यांची मारहाण, एकाचा मृत्यू