भंडारा : क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणातून एका कुटुंबाने शेजाऱ्याचा जीव (Murder) घेतला. भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील (Bhandara Crime) मानेगांव बाजार येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गायीला धुतल्यानंतर (Cow) आवारात पाणी आल्यावरुन भांडण झालं होतं. त्यानंतर शेजाऱ्यांनी ग्रामस्थाची हत्या केल्याचा आरोप आहे. क्षुल्लक कारणावरुन सुरु झालेला वाद इतका विकोपाला गेला की मते पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांनी महादेव बोंदरे, त्यांची पत्नी आणि मुलगा दिनेशला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात बोंदरे कुटुंब गंभीर जखमी झाले. लाकडी दांड्याने वार करत तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी आरोपी कुटुंबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.