MRI काढताना नागपुरात चिमुकल्याचा मृत्यू, पालकांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

| Updated on: Apr 01, 2022 | 7:59 AM

नागपुरातील एम्स हॉस्पिटलमध्ये चिमुरड्याचा एमआरआय काढला जात होता. त्यावेळी तो कुठलीही हालचाल करत नसल्याचं पालकांच्या लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केले.

MRI काढताना नागपुरात चिमुकल्याचा मृत्यू, पालकांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

नागपूर : वैद्यकीय तपासणी सुरु असताना बालकाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एमआयआर काढत असताना चिमुकल्याचा मृत्यू (Child Death) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूरमधील ‘एम्स’ रुग्णालयात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. चिमुकल्याच्या पालकांकडून नागपुरातील सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘एम्स’ रुग्णालयातील (AIIMS Nagpur) डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या चिमुकल्याला प्राण गमवावे लागल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. संकल्प असं तीन वर्षांच्या मयत चिमुकल्याचं नाव आहे. नागपुरातील एम्स हॉस्पिटलमध्ये संकल्पचा एमआरआय (MRI) काढला जात होता. त्यावेळी त्याच्या कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचं पालकांच्या लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी डॉक्टरांवर आरोप केले.

काय आहे प्रकरण?

एमआरआय काढत असताना चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार नागपूर शहरात समोर आला आहे. नागपूरमधील ‘एम्स’ रुग्णालयात ही घटना घडल्याचा आरोप आहे. संकल्प असं तीन वर्षांच्या मयत चिमुकल्याचं नाव आहे.

पालकांचा डॉक्टरांवर आरोप

नागपुरातील एम्स हॉस्पिटलमध्ये संकल्पचा एमआरआय काढला जात होता. त्यावेळी तो कुठलीही हालचाल करत नसल्याचं पालकांच्या लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केले.

चिमुकल्याच्या पालकांनी नागपुरातील सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे. ‘एम्स’ रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलाला जीव गमवावा लागल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

अकोल्यामध्ये उष्माघाताचा बळी, शेतातून काम करून परतताना शेतकऱ्याचा मृत्यू

सेप्टिक टँक साफ करताना गुदमरुन दोघांचा मृत्यू, ठाण्यात एका आठवड्यातील दुसरी घटना

मुंबईत डॉक्टरच्या कारची धडक, पुलावरुन 30 फूट उडून पडल्याने बाईकस्वार मृत्युमुखी