Accident | मुंबईत डॉक्टरच्या कारची धडक, पुलावरुन 30 फूट उडून पडल्याने बाईकस्वार मृत्युमुखी

27 वर्षीय आरोपी कार चालक डॉक्टर रेहान राशीदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्यचा मृत्यू मंगळवारी झाला असला, तरी घटनेच्या रात्रीच उपस्थितांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केल्याने गावदेवी पोलिसांनी त्याला अटक केली होती

Accident | मुंबईत डॉक्टरच्या कारची धडक, पुलावरुन 30 फूट उडून पडल्याने बाईकस्वार मृत्युमुखी
मयत आदित्य देसाईImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 11:32 AM

मुंबई : उड्डाणपुलावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारच्या धडकेत (Car Accident) जखमी झालेल्या बाईकस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील गावदेवी फ्लायओव्हरवर हा अपघात झाला होता. जे जे हॉस्पिटलमध्ये (JJ Hospital) कार्यरत असलेला निवासी डॉक्टर केम्प्स कॉर्नर ब्रिजवर चुकीच्या दिशेने भरधाव वेगात येत होता. त्याच्या कारने दिलेल्या धडकेत 22 वर्षीय आदित्य देसाई 30 फूट खाली कोसळला होता. त्याला उपचारासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

नेमकं काय घडलं?

27 वर्षीय आरोपी कार चालक डॉक्टर रेहान राशीदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्यचा मृत्यू मंगळवारी झाला असला, तरी घटनेच्या रात्रीच उपस्थितांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केल्याने गावदेवी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला बुधवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे.

मध्यरात्रीच्या वेळी अपघात

पोलिसांनी डॉक्टरच्या रक्ताचे नमुने घेतले असून अपघाताच्या वेळी त्याने मद्यपान केले होते का, याचा तपास केला जाणार आहे. सोमवारी मध्यरात्री एक वाजून 55 मिनिटांनी आदित्यला आपल्या बाईकने ऑफिसहून घरी परत येत असताना ही घटना घडली होती.

तीस फूट उंच उडून आदित्य पडला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राशिद बाबूलनाथहून हाजी अलीच्या दिशेने जात होता. गावदेवी पुलाजवळ चुकीच्या दिशेने तो भरधाव वेगात गाडी चालवत होता. ही धडक इतकी जबरदस्त होती, की आदित्य पुलावरुन थेट तीस फूट खाली रस्त्यावर उडाला.

अपघातानंतर राशीद आणि इतर वाहन चालकांनी त्याला जे जे रुग्णालयात दाखल केलं. आदित्य गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. आरोपीची कार आणि आदित्यची बाईक पोलिसांनी जप्त केली आहे.

संबंधित बातम्या :

ड्युटीवरुन परतताना बाईक कारवर धडकली, Wardha मध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

 इंटरव्ह्यूहून परत येताना काळाचा घाला, कार दुभाजकाला धडकून आर्किटेक्टचा मृत्यू

भरधाव ट्रकने चिरडलं, चार वर्षांच्या चिमुरड्याने वडिलांदेखत प्राण सोडले

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.