ड्युटीवरुन परतताना बाईक कारवर धडकली, Wardha मध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

ड्युटीवरुन परतताना बाईक कारवर धडकली, Wardha मध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
वर्ध्यात वन विभाग कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
Image Credit source: टीव्ही9

संजय शंकरराव पोलार हे पहिले सैन्य दलात कार्यरत होते. तिथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी वन विभागातील नोकरी स्वीकारली. पानेवाडी परिसरात त्यांची नोकरी असल्याने दररोज दुचाकीने ये-जा करत होते.

चेतन व्यास

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 30, 2022 | 9:31 AM

वर्धा : वन विभागाच्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू (Bike Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. कर्तव्यावरुन परत येत असताना त्यांना अपघात झाला होता. वर्धा जिल्ह्यात (Wardha) ही धक्कादायक घटना घडली. दुचाकीची चारचाकी वाहनाला धडक बसून अपघात झाल्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्याला (Forest Department) प्राण गमवावे लागले. संजय शंकरराव पोलार (वय 49 वर्ष, रा. नाचणगाव) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा अपघात बोथली गावाजवळ घडला.

संजय शंकरराव पोलार हे पहिले सैन्य दलात कार्यरत होते. तिथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी वन विभागातील नोकरी स्वीकारली. पानेवाडी परिसरात त्यांची नोकरी असल्याने दररोज दुचाकीने ये-जा करत होते.

नेमकं काय घडलं?

कर्तव्यावरून परतत असताना बोथली गावाजवळ उभ्या कारला दुचाकीची धडक बसल्याने संजय यांचा अपघात झाला. डोक्याला दुखापत झाल्याने पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय पोलार यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : टिटवाळ्यात दीड वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद

Car Accident | इंटरव्ह्यूहून परत येताना काळाचा घाला, कार दुभाजकाला धडकून आर्किटेक्टचा मृत्यू

Jalgaon CCTV Video: सायकलवाल्याला वाचवण्याच्या नादात पोलीस व्हॅनची कारला धडक, ऑटोवाल्याचा मूर्खपणा भोवला, अपघात सीसीटीव्हीत कैद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें