VIDEO : टिटवाळ्यात दीड वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद

VIDEO : टिटवाळ्यात दीड वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद
टिटवाळ्यात दीड वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडले
Image Credit source: TV 9

या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या बालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात टेम्पो चालक सैफ फारुखी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला टिटवाळा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

अमजद खान

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 29, 2022 | 4:08 PM

कल्याण : घराच्या परिसरात खेळत असताना एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडल्याची हृदयद्रावक घटना टिटवाळाजवळ बल्याणी परिसरात घडली आहे. टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणाने दीड वर्षाच्या बालका (Child)चा जीव घेतला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही (CCTV) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत टेम्पो चालक सैफ फारुखी याला अटक केली असून त्याची जामिनावर सुटका झाली आहे. (The tempo crushed the one and a half year old boy in Titwala, incident captured in cctv)

टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात

कल्याणजवळ असलेल्या बल्याणी परिसरात उमर शहा हा आपली पत्नी गुलशन, सात वर्षाचा मुलगा, 3 वर्षाची मुलगी व दीड वर्षाचा मुलगा यांच्यासोबत राहतात. उमर विक्रोळी येथे कामाला असून 24 तारखेला नेहमीप्रमाणे सकाळी ते कामावर निघून गेले. त्यानंतर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उमर यांची तिन्ही मुलं घराच्या बाजूला असलेल्या मैदानात टेम्पो शेजारी खेळत होती. याच दरम्यान टेम्पो चालक आला आणि थेट टेम्पोत बसून टेम्पो पुढे नेला. मात्र या टेम्पो चालकाचा निष्काळजीपणा शेजारी खेळत असलेल्या दीड वर्षाच्या बालकाच्या जीवावर बेतला. टेम्पो शेजारी खेळत असलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावरून टेम्पोचं चाक गेलं.

या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या बालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात टेम्पो चालक सैफ फारुखी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला टिटवाळा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. (The tempo crushed the one and a half year old boy in Titwala, incident captured in cctv)

इतर बातम्या

Sangli Crime : सांगलीत रस्ताच्या कडेला बेवारस स्त्री जातीचे बाळ सापडले

क्रूरतेचा कळस!! पारधी महिला घरासमोर फिरतेय म्हणून अंगावर सोडला कुत्रा, जखमी महिलेची Beed पोलिसात धाव

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें