Malegaon Accident | भरधाव ट्रकने चिरडलं, चार वर्षांच्या चिमुरड्याने वडिलांदेखत प्राण सोडले

Malegaon Accident | भरधाव ट्रकने चिरडलं, चार वर्षांच्या चिमुरड्याने वडिलांदेखत प्राण सोडले
मालेगावात ट्रकखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू
Image Credit source: टीव्ही9

नाशिक जिल्ह्यात मालेगांव शहरातील पवारवाडी शिवारामध्ये रझा चौकात ट्रकखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. वडिलांच्या सोबत दवाखान्यातून परत येत असताना हा अपघात झाला.

मनोहर शेवाळे

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 28, 2022 | 9:13 AM

मालेगाव : ट्रकखाली चिरडून (Truck Accident) चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगांव शहरातील (Malegaon Nashik) पवारवाडी शिवारामध्ये रझा चौकात हा प्रकार घडला. वडिलांसोबत पायी निघालेल्या चिमुकल्याला भरधाव ट्रकने चिरडले. अपघातात चार वर्षांच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. हाफिजूर रहेमान अन्सारी असं मयत बालकाचं नाव आहे. वडिलांच्या डोळ्यादेखतच चिमुरड्याने प्राण सोडले. चिमुकल्याच्या मृत्यूने (Child Death) कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव ट्रकमुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्या वाढल्याने मालेगाववासियांनी संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिक जिल्ह्यात मालेगांव शहरातील पवारवाडी शिवारामध्ये रझा चौकात ट्रकखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. वडिलांच्या सोबत दवाखान्यातून परत येत असताना हा अपघात झाला.

ट्रकच्या चाकाखाली चिरडून मृत्यू

रझा चौकात बापलेक चालत येत होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली दबला गेल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. हाफिजूर रहेमान अन्सारी असे 4 वर्षांच्या बालकाचे नाव आहे.

भरधाव ट्रकमुळे वाढते अपघात

काही महिन्यांपूर्वीही ट्रक खाली चिरडून एक मुलाचा मृत्यू झाला होता. मालेगाव शहरात अशाच पद्धतीने भरधाव ट्रकचा वावर असल्याने या घटना होत आहेत. शहराबाहेर ट्रक टर्मिनल बनवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या :

Jalgaon Accident | अरुंद रस्त्यावर कारची धडक, दोघा बाईकस्वार तरुणांचा मृत्यू

Amravati-Nagpur Highwayवर अपघात; दोन जण ठार, दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅव्हल्सने कारला नेले फरफटत; तिहेरी अपघातात 1 ठार, 2 गंभीर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें