‘हॅलो ! बजाज फायनान्समधून बोलतेय, कमी व्याजात जास्त पैसे देते’, शेकडोंना लुबाडणारी पूजा नागपूर पोलिसांकडून जेरबंद

| Updated on: Aug 22, 2021 | 8:46 PM

ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना पुढे येत आहेत. तरीदेखील काही नागरिक यातून धडा न घेता आमिषाला बळी पडतात आणि आपल्या मेहनतीची कमाई गमावून बसतात. अशीच काहिशी घटना नागपुरात समोर आली आहे.

हॅलो ! बजाज फायनान्समधून बोलतेय, कमी व्याजात जास्त पैसे देते, शेकडोंना लुबाडणारी पूजा नागपूर पोलिसांकडून जेरबंद
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोन माजी अध्यक्षांना ईडीचे समन्स, 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता प्रकरणी नोटीस
Follow us on

नागपूर : ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना पुढे येत आहेत. तरीदेखील काही नागरीक यातून धडा न घेता आमिषाला बळी पडतात आणि आपल्या मेहनतीची कमाई गमावून बसतात. अशीच काहिशी घटना नागपुरात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता देशभरात लोकांना ऑनलाईन लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ही टोळी कमी व्याजदराचे आमिष दाखवून सर्वसामान्यांना फसवायची. कर्जासाठी ते नागरिकांकडून आधी पैसे मागायचे. पैसे घेतल्यानंतर आपला फोन बंद करायचे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी 53 वर्षीय महिलेला अटक केली आहे.

देशभरातील अनेकांना लाखोंचा गंडा

पूजा मॅडम उर्फ पूजा सिंग असं 53 वर्षीय आरोपी महिलेचं नाव आहे. पूजा हरियाणातील हिसार जिल्ह्यातील लाडवा येथील रहिवासी आहे. कमी व्याजदराच्या दीर्घ मुदतीचे लाखो रुपयांचे कर्ज झटपट उपलब्ध करुन देण्याची थाप मारुन तिने आतापर्यंत अनेकांना लुबाडलं आहे. तिने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील अनेकांना अशाप्रकारे लाखोंचा गंडा घातला आहे.

नेमकं प्रकरण काय?

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आणि रेल्वेत कार्यरत असलेले देवानंद अनिल शेंडे यांना या टोळीने फसवलं. या टोळीतील आरोपी पूजा हिने फोन करुन आपण बजाज फायनान्समधून बोलत असल्याचं सांगितलं. तसेच दहा वर्षांसाठी 6.9 टक्के व्याजदरावर 8 लाखांचे कर्ज उपलब्ध करुन देऊ शकतो, असं सांगितलं. आरोपी पूजा आणि तिच्या साथीदारांनी देवानंद शेंडे यांना अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला.

पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी फोन बंद केला

आरोपींनी शेंडे यांचे कागदपत्रे मागवले. त्यानंतर विविध कारणे देवून पैशांची मागणी केली. आरोपींनी असं करत शेंडे यांच्याकडून जवळपास 28 हजार रुपये उकळले. अखेर शेंडे यांना संशय आला. त्यांनी आपल्याला कर्ज नको असल्याचं सांगत पैसे परत मागितले. पण त्यानंतर आरोपी पूजा तिचे साथीदार विकास जैन, दीपक चव्हाण, संजीव कुमार, ओमप्रकाश यांनी शेंडे फोन स्वीकारणं बंद केलं. त्यानंतर त्यांनी आपला फोनच स्वीच ऑफ केला.

आरोपी पूजाला बेड्या

अनिल शेंडे यांना आपली फसवणूक झाल्याचं समजलं. त्यानंतर त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कारवाईस सुरुवात केली. पोलिसांनी शेंडे यांनी जमा केलेली रक्कम कोणत्या खात्यात वळती झाली ते शोधून त्यावर नमूद संपर्क क्रमांकाच्या आधारे पूजाचा पत्ता काढला. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. तिच्या अटकेनंतर पोलीस आता तिच्या टोळीतील आणखी इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :

पती गुन्हेगार होताच, पण पत्नीचा क्रूरतेला कळस, जोडीदाराला संपवलं, नंतर घरातच गाडलं, मुंबईतील भयानक घटना

मंत्रालयाबाहेर कीटनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, दोन दिवसांच्या उपचारानंतर शेतकऱ्याचं निधन, मन सुन्न करणारी घटना