कारच्या सीटखालून 70 किलो गांजाची तस्करी, यूपीच्या आरोपीला नागपुरात अटक

| Updated on: Jul 04, 2021 | 10:00 AM

नागपूर ग्रामीण पोलिसांनी चंद्रपूर नागपूर रोडवर सापळा रचून गांजा तस्करी करणाऱ्यांना पकडलं. एका कारमधून उत्तर प्रदेशमधील आरोपी गांजा तस्करी करत असल्याचं समोर आलं आहे.

कारच्या सीटखालून 70 किलो गांजाची तस्करी, यूपीच्या आरोपीला नागपुरात अटक
नागपुरात कारमधून गांजा जप्त
Follow us on

नागपूर : गांजा तस्करांची धरपकड करण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना मोठं यश आलं आहे. चंद्रपूर नागपूर रोडवर सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. जवळपास सात लाख रुपये किमतीचा सुमारे 70 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. (Nagpur Police detained Cannabis from a car)

नागपूर ग्रामीण पोलिसांनी चंद्रपूर नागपूर रोडवर सापळा रचून गांजा तस्करी करणाऱ्यांना पकडलं. एका कारमधून उत्तर प्रदेशमधील आरोपी गांजा तस्करी करत असल्याचं समोर आलं आहे. कारच्या सीटखाली आणि डिक्कीच्या खालच्या भागात गांजा लपवून ठेवण्यात आला होता.

35 पॅकेटमध्ये 69 किलो 500 ग्राम गांजा सापडला आहे. जवळपास 6 लाख 95 हजार रुपये किमतीच्या गांजाची तस्करी केली जात होती.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

वाशिममध्ये घरातून गांजा जप्त

वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ विरलहूजी नगरमधील घरकुलात अवैध रित्या गांजा साठवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईत एकूण 15 किलो गांजा जप्त करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आले आहे.

गांजा पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला

मिळालेल्या माहितीनुसार वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ विरलहूजी नगरमधील एका घरकुलात अवैधरित्या गांजाची साठवणूक केली जात होती. पोलिसांना या प्रकाराची माहिती आपल्या सूत्रांच्या माध्यमातून समजली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांनी कारवाई करण्याचे ठरवले. तसेच त्यानुसार सापळा रचला.

जप्त केलेल्या गांजाची किंमत 5 लाख रुपये

पोलिसांच्या या कारवाईत मनकरना मोहन जाधव या महिलेच्या घरातून तब्बल 15 किलो जांगा मिळाला. हा सर्व गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत ही 5 लाख 25 हजार रुपये आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईनंतर महिला आरोपीला अटक करण्यात आले आहे. तसेच या महिला आरोपीविरुद्ध वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

घरकुलात लपवला 15 किलो गांजा, वाशिम पोलिसांकडून महिलेला बेड्या

Heennaa Panchaal | इगतपुरी रेव्ह पार्टी, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळला अटक

(Nagpur Police detained Cannabis from a car)