
पत्नीने थंड डोक्याने कट रचून पतीची हत्या केल्याच्या अनेक घटना आपण गेल्या काही काळात ऐकल्या आहेत, त्याबद्दल वाचलंही आहे. असाच एक भायनक प्रकार खुद्द महाराष्ट्रात, विद्येचं माहेर म्हटल्या जाणाऱ्या पु्ण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये घडला. गेल्या आठवड्यात ऐन दिवळीच्या दिवशीच सामाजिक कार्यकर्ता नकुल भोईर याची अतिशय क्रूरपणे, थंड डोक्याने, त्याच्या सहचारिणीने, त्याच्या पत्नीने हत्या केली. मात्र यामध्ये ती एकटीच सामील नव्हती, तिच्यासोबत तिचा प्रियकरही या गुन्ह्यात सहभागी होता हे समोर आलं आहे.
गेल्या आठवड्याभरात याप्रकरणात रोज नवनवी आणि तितकीच धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी नुकतीच सिद्धार्थ यालाही नकुल भोईर हत्याप्रकरणात अटक केली. त्याने व चैताली , या दोघांनी मिळून नकुलची हत्या केली आणि थंड डोकयाने पुढचाही प्लान रचल्याचे समोर आले आहे. मात्र एखाद्या गुन्हेगाराने कितीही पळवाट शोधल्या, तरी कधी ना कधी त्याचं बिंग फुटतंच. तसंच काहीसं या प्रकरणातही झालं. आणि दोघांनाही बेड्या पडल्याच.
फक्त पत्नीने नव्हे प्रियकरानेही केला नकुलचा खून
पिंपरी चिंचवड मधील सामाजिक कार्यकर्ते ,नकुल भोईर यांच्या खून प्रकरणाला धक्कादायक वळण आलं आहे. गेल्या आठवड्यात त्यांची पत्नी चैताली यांनी नकुलचा गळा आवळून खून केल्याची माहिती समोर आली होती. मात्र , नकुलचा खून करताना, चैतालीशी प्रेमसंबंध असलेला, तिचा मित्र सिद्धार्थ पवार हा देखील सोबत होता,आणि दोघांनी मिळून कट रचून नकुलचा निर्घुण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली.
पत्नी चैतालीचे आरोपी सिद्धार्थ याच्याशी अनैतिक संबंध होते ही बाब नकुलला कळाली तेव्हा त्याने चैतालीला आधी समजावून सांगितंल, मात्र तिने काहीच ऐकंल नाही, नंतरही चैताली आरोपी सिद्धार्थला भेटायची. याच मुद्यावरून चैताली आणि नकुल यांच्यामध्ये टोकाचे वाद व्हायचे अशी माहिती समोर आली आहे. ज्या दिवशी नकुलची हत्या झाली, त्या दिवशी देखील हेच घडलं, मात्र यावेळी चैताली एकटीच नव्हती नाही तर तिचा मित्र सिद्धार्थ पवार देखील तिच्या सोबत होता.
Pune Crime : नकुल भोईर हत्येत नवा ट्विस्ट, पत्नीच नव्हे, खुनात आणखी एक सहभागी.. कोण आहे तो ?
रात्री वाढला वाद आणि चैतालीने थेट घेतला जीव
दुपार पासून चैताली आणि नकुल भोईर यांच्यात चारित्र्यावर संशय घेण्यावरून वाद आणि मारहाणीचे प्रकार घडत होते. या वादाने रात्री उशिरा रागाची परिसीमा गाठली आणि मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नकुलची पत्नी, चैताली हिने कापडाने नकुलचा गळा आवळायला सुरवात केली. मात्र तेव्हा नकुल जीवाच्या आकांताने प्रतिकार करू लागला, ते पहून तिथेच उपस्थित असलेल्या सिद्धार्थने चैतालीची साथ दिली आणि ती ज्या कापडाने नकुलचा गळा आवळत होती त्याचं दुसरं टोक ओढलं आणि जोराचा हिसका देऊन दोघांनीही नकुलचा अतिशय निर्घृणपणे खून केला.
नकुलचा जीव गेल्याचं लक्षात आल्यावर चैतालीने तिचा मित्र सिद्धार्थला तिथून जाण्यास सांगितलं. नकुलच्या खुनाचा सर्व आरोप स्वतःवर घेत तिने स्वतःच पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं. पोलिस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी पत्नी चैताली हिला ताब्यात घेतलं. मात्र चैतालीच्या बोलण्यात तफावत वाटली, कारण घटनास्थळी 3 लोकांनी दारू प्यायल्याची शक्यता दिसत होती, हा मुद्दा पोलिसांच्या लक्षात आला. नंतर त्यांनी चैतालीला खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता तिने सिद्धार्थचं नाव सांगितलं.
असा अडकला जाळ्यात
त्यानंतर पोलिसांनी आरोपी सिद्धार्थलाही तत्काळ ताब्यात घेतलं. आणि त्याच्या उपस्थितीबद्दल जबाब नोंदविला आणि तिथेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला . आरोपी सिद्धार्थ याने आपल्या जबाबात दिलेल्या माहिती नुसार पोलिसांनी घटना स्थळावरील CCTV फुटेज तपासलं. मात्र सिद्धार्थने जाबाबत दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात cctv मध्ये दिसणारी दृश्य यामध्ये बरीच तफावत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
विशेष म्हजे, आरोपी सिद्धार्थ हा घटनास्थळी आला आणि परत गेला, त्या दरम्यान असलेली वेळ जुळत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी सिद्धार्थ पवार ला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली. अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली . चैतालीसोबत आपणही नकुलची ह्त्या केल्याचे त्याने मान्य केलं. दरम्यान नकुल भोईर यांच्या खुन केल्या प्रकरणी सिद्धार्थ पवारला अटक करून न्यायालय समोर हजर केले असता पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना 1 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपक गोसावी यांनी दिली.