Sanjay Biyani : नवा ट्वीस्ट! संजय बियाणींच्या संपत्तीवर पत्नीशिवाय आणखी एका महिलेचा वारसदार म्हणून दावा

Nanded Crime News : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींचा यांच्या संपत्तीचा वारसदार कोण, यावरुन आता सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

Sanjay Biyani : नवा ट्वीस्ट! संजय बियाणींच्या संपत्तीवर पत्नीशिवाय आणखी एका महिलेचा वारसदार म्हणून दावा
संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या
राजीव गिरी

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 18, 2022 | 8:58 AM

नांदेड : नांदेडचे (Nanded News) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या हत्येनंतर (Sanjay Biyani Murder case) आता नवा ट्विट याप्रकरणी पाहायला मिळाला आहे. संजय बियाणींच्या हत्येनंतर आता त्यांच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण, यावरुन चर्चांना उधाण आलंय. संजय बियाणी यांची पत्नी अनिता यांनी वारसदार म्हणून न्यायलयात आधीच दावा केला होता. मात्र अन्य एका महिलेनं यावर आक्षेप नोंदवला आहे. या महिलेनं आपली चार वर्षांची मुलगी संजय बियाणींच्या संपत्तीची वारसदार असल्याचा आक्षेप नोंदवलाय. यामुळे बियाणी कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलंय. न्यायालयात याप्रकरणी 24 जून रोजी आता पुढील सुनावणी पार पडेल. या सुनावणीकडे संपूर्ण नांदेड जिल्ह्याची नजर लागली आहे. संजय बियाणींची गोळ्या घालून दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली होती. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या या हत्याकांडानंतर नांदेड पोलिसांनी (Nanded Police) महिन्याभरात या हत्येचा छडा लावला होता. महाराष्ट्रासह अन्य चार राज्यात तपास केला होता.

कोण आहे असली वारसदार?

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींचा यांच्या संपत्तीचा वारसदार कोण, यावरुन आता सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत. हे संपूर्ण प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. प्रतिशिवाय आणखी एका महिलेनं वारसदार असल्याचा दावा केला आहे. यामुळे कोर्टात आता नेमका काय युक्तिवाद होतो, याकडेही आता सगळ्यांचं बारीक लक्ष असणार आहे.

कुटुंबात कलह

काही आठवड्यांपूर्वीच संजय बियाणींचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीमधील वादही चव्हाट्यावर आलेला होता. दोघांकडूनही परस्परविरुद्ध तक्रारी पोलिसात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही संजय बियणींच्या कुटुंबातील अंतर्गत कलहाची चर्चा पाहायाल मिळाली होती. आता तर त्यांचा वारसदार कोण? यावरुन पुन्हा नवा वाद झेडला गेलाय.

हे सुद्धा वाचा

प्रसिद्ध बांखाम व्यावसायिय संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आलेल्या संजय बियाणी यांच्या हत्येनं संपूर्ण बांधकाम विश्व हादरुन गेलेलं. संजय बियाणी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत. खंडणीपोटी गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. आतापर्यंत संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें