AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar Film : अक्षय कुमारला ‘धुरंधर’ची धास्ती.. घाबरून घेतला मोठा निर्णय ?

Akshay Kumar Film : अक्षय कुमार सध्या फुलस्पीडने घोडदौड करत आहे. हातातल्या चित्रपटांचं काम तो झपाट्याने संपवत आहे. मात्र याच दरम्यान त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. काय घडलं नक्की ?

Akshay Kumar Film : अक्षय कुमारला ‘धुरंधर’ची धास्ती.. घाबरून घेतला मोठा निर्णय ?
अक्षय कुमारने घेतला मोठा निर्णयImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Dec 31, 2025 | 3:08 PM
Share

Akshay Kumar Film : सरत 2025 हे वर्ष अभिनेता अक्षय कुमारसाठी (Akshay Kumar) ठीकठाक गेलं. त्याचे 4 चित्रपट रिलीज झाले आणि एकही आपटला नाही. “स्कायफोर्स” पासून सुरू झालेली ही सुरुवात “केसरी चॅप्टर 2,” “हाऊसफुल 5,” आणि “जॉली एलएलबी 3” मध्येही चांगली चालली. सध्या अक्षयकुमारकडे अनेक मोठे चित्रपट आहेत, ज्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. 20206 या वर्षांत मध्ये, तो प्रियदर्शनसोबत दोनदा धमाल करणार आहे. “वेलकम टू द जंगल” हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची तयारी देखील सुरू आहे. सध्या अक्षय कुमार त्याचे आगामी चित्रपट वेगाने पूर्ण करत आहे. मात्र याच दरम्यान एक मोठी अपडेट आली आहे. अजय देवगणनंतर, अक्षय कुमारनेही धुरंधर २ मुळे, रस्त्यातून हटण्याचा निर्णय घेतला आहे का ? 2026 मध्ये प्रदर्शित होणारा अक्षयचा मोठा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे का ? चला जाणून घेऊया सर्वकाही..

सध्या सगळीकडे ‘धुरंधर’ (dhurandhar) चित्रपटाचा बोलबाला आहे. 27 दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाने भारतात 700 कोटीपेक्षा जास्त गल्ला जमवला असून जगभरात चित्रपटाने 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. पण चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस कमी होत नाहीये, उलट ती वाढतच चालली आहे. रणवीर सिंगच्या चित्रपटाचा दुसरा भाग 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. तेव्हा ईद असून त्याचवेळी यशचा ‘टॉक्सिक’ चित्रपटाही येणार आहे. एवढंच नव्हे तर त्याचवेळी अजय देवगणचा ‘धमाल 4’ हा चित्रपटही रिलीज होणार होता, मात्र नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. मग आता अक्षय कुमार कोणता चित्रपट हटवण्याची प्लानिंग करतोय आणि तेही का ?

अक्षयचा कोणता चित्रपट झाला पोस्टपोन ?

अक्षय कुमारकडे सध्या मोठे प्रोजेक्ट्स आहेत, त्यामध्ये प्रियदर्शन निर्मित आणि बालाजी मोशन पिक्चर्स ने पैसा लावलेला BHOOT BANGLA या चित्रपटाचा समावेश आहे. जेव्हा या चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा तो 2025 मध्ये प्रदर्शित होईल असे जाहीर करण्यात आलं होतं. पण त्यानंतर, डिसेंबर 2024 मध्ये, अक्षय कुमारचा आणखी एक पोस्टर रिलीज झाला, ज्यामध्ये भूत बंगला चित्रपटाची नवीन रिलीज तारीख उघड झाली तो होती 2 एप्रिल 2026. पण आता, एका रिपोर्टनुसार, अक्षय कुमार हा पुन्हा एकदा त्याच्या चित्रपटाची रिलीज तारीख बदलण्याचा विचार करत आहे. 2026 च्या सुरूवातीला त्याला कोणतीही रिस्क घ्यायची इच्छा नाही. ‘धुरंधर 2’ मुळे त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

रणवीर सिंह चा ‘धुरंधर 2’ 19 मार्चला रिलीज होणार आहे. त्यानंतर 2 आठवड्यांनी, 2 एप्रिलला अक्षयचा पिक्चर रिलीज होणार आहे. पण ‘धुरंधर’ सध्या घातलेला धूमाकूळ पाहता अक्षय कुमारने मागे हटण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. प्रियदर्शन आणि अक्षय कुमार हे या आगाी चित्रपटाचे वेळापत्रक बदलण्यास तयार आहेत. निर्माते लवकरच अधिक माहिती देतील. पण आतापर्यंत निर्मात्यांनी चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याबाबत काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल.
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने.
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर.