The Kerala Story 2 : ‘द केरळ स्टोरी’च्या सीक्वेलची कथा आणखी भयानक; पुन्हा निर्माण होणार वाद?
The Kerala Story 2 : 'द केरळ स्टोरी' सिनेमाच्या सिक्वेलची सर्वत्र चर्चा... सिनेमाची कथा असणार आणखी भयानक... सिनेमामुळे पुन्हा निर्माण होणार वाद? सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहेत.

The Kerala Story 2 : बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे तयार झाले ज्यामुळे अनेक ठिकाणी वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. शिवाय अनेक ठिकाणी सिनेमे बॅन देखील करण्यात आले. अशाच एका सिनेमांपैकी एक म्हणजे ‘द केरळ स्टोरी’… ‘द केरळ स्टोरी’ सिनेमातून एक भयान वास्तव समोर आलं. 2023 मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा ‘लव जिहाद’ या मुद्यावर आधरलेला होता. यामुळे अनेक ठिकाणी संतापाची लाट उसळली. पण सिनेमा वादच्या भोवऱ्यात अडकलेला असताना सिनेमाने मोठी कमाई केली. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने बक्कळ कमाई केली. दिग्दर्शक सुदीप्तो सेन दिग्दर्शित या सिनेमात अदा शर्मा हिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता लवकरच सिनेमाता सिक्वल प्रदर्शित होणार आहे.
‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या सिक्वलची शुटिंग देखील पूर्ण झाली आहे. आता चाहते देखील ‘द केरळ स्टोरी 2’ या सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे… मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाचं चित्रीकरण देखील पूर्ण झालं आहे आणि निर्माते 2026 मध्ये सिनेमा प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत.
“द केरळ स्टोरी” चा सिक्वेल केरळमध्ये आधीच चित्रित करण्यात आला आहे, रिपोर्टनुसा, या भागात अधिक गंभीर आणि गडद कथा दाखवण्यात येईल. The Kerala Story 2 सिनेमाची कास्ट आणि अन्य गोष्टी गुपित ठेवण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “द केरळ स्टोरी 3” सिनेमाचं चित्रीकरण आधीच अतिशय नियंत्रित आणि सुरक्षित पद्धतीने झालं आहे. निर्माते विपुल अमृतलाल शाह यांना चित्रीकरणादरम्यान कोणतीही अडचण नको होती म्हणून महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेण्यात आली.
याशिवाय, सूत्रांनी सांगितलं की, सिनेमाच्या शूटिंग सेटवर कडक सुरक्षा व्यवस्था होती आणि चित्रपटातील आशयाचे संरक्षण करण्यासाठी नो फोन पॉलिसी… अशी पॉलिसी देखील लागू करण्यात आली होती. शुटिंगच्या दरम्यान, कलाकार आणि इतरांना फोनवर बोलण्याची परवानगी देखील नव्हती… सेटवरून काही लीक होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार सिनेमा 27 फेब्रवारी 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक देखील सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. आता “द केरळ स्टोरी” नेतर “द केरळ स्टोरी 2” बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
