Bangladesh: युद्धाची तयारी करतायेत युनूस? तुर्कीसोबत मोठा शस्त्र करार, या मिसाईलमुळे भारताचे टेन्शन वाढणार?
Bangladesh Tukey Cirit Laser-Guided Missile Deal: बांगलादेशाच्या काळजीवाहू सरकारचे सल्लागार युनूस हे भारतावर दात खाऊन आहेत, हे वेगळे सांगायला नको. अमेरिकेची कठपुतळी असलेल्या युनूस त्यामुळेच भारतविरोधी कुरापती करत आहेत. त्याचाच एक भाग समोर आला आहे. भारताला डिवचण्यासाठी युनूस यांनी तुर्कीसोबत मोठा शस्त्र करार केला आहे.

Bangladesh Tukey Cirit Laser-Guided Missile Deal: बांगलादेशाच्या काळजीवाहू सरकारचे सल्लागार मोहम्मद युनूस हे भारताला पूर्वीपासूनच पाण्यात पाहतात. पाकिस्तानशी जवळीक, चीनशी संबंध आणि आता थेट तुर्कीसोबत लष्करी आणि शस्त्र करार करुन युनूस भारताला सातत्याने डिवचत आहेत. मोहम्मद यूनुस सरकारने वायुदलासाठी (BAF) तुर्कीकडून अत्याधुनिक सीरिट (Cirit) लेझर-गायडेड मिसाइल सिस्टम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ढाका येथे सुरक्षा खरेदी महासंचालयाने (DGDP) यासाठी एक निविदा काढली आहे. तुर्कीची कंपनी रोकेत्सनकडून(Roketsan) युनूस सरकार हे घातक मिसाईल खरेदी करणार आहे. त्यामुळे ढाकाची लष्करी ताकद वाढेल आणि मारक क्षमताही वाढेल.
सीरिट मिसाईलची क्षमता आणि पॉवर
तुर्कीची सीरिट (Cirit) मिसाईल ही जगातील सर्वात प्रगत 70 मिमी लेझर-गायडेड मिसाईलपैकी एक आहे. हे क्षेपणास्त्र त्याचे लक्ष्य 8 किमीच्या अंतरावरून अगदी अचूक हेरते आणि भेदते. या मिसाईलमध्ये मल्टी-पर्पज वॉरहेड आहे. ते बख्तरबंद वाहनांसाठी, सैन्य विरोधी आणि आग लावणाऱ्या वाहनांच्या चिंधड्या करण्यात सक्षम आहे. या मिसाईलेच वजन 15 किलोग्रॅम आहे. तर हे क्षेपणास्त्र हेलिकॉप्टर, ड्रोन आणि लँड वाहनावरून सहज वाहून नेता येते. कमी खर्चात हे घातक मारा करते.
बांगलादेशाने यापूर्वीच तुर्कीकडून बायरकतार टीबी-2 ड्रोन खरेदी केले आहे. हे भारतीय सीमेवर तैनात करण्यात आले आहे. नॉर्थ ईस्ट न्यूजने दावा केला आहे की मिसाईल खरेदीसाठी बांगलादेश सैन्य दलाने निविदा काढण्याचे नाटक केले आहे.यापूर्वीच तुर्कीशी त्यांचा करार झाला आहे. Cirit शस्त्र खरेदी करण्यात येणार हे अगोदरच ठरलेले आहे. भारताविरोधात त्याचा वापर करणार का, अर्थात हे अजून समोर आलेले नाही. पण सध्याची बांगलादेशाची रणनीती ही भारताविरोधी आहे हे समोर येत आहे.
भारतावर काय होईल या क्षेपणास्त्राचा परिणाम?
तुर्कीची ही मिसाईल 70 mm चे रॉकेट आणि गायडेट अँटी टँक मिसाईल मोठे अंतर कापू शकते. ही मिसाईल विविध प्लॅटफॉर्मवर सहज फीट बसते. हे मिसाईल बांगलादेश लष्करासाठी एक मोठी संधी ठरणार आहे. यामुळे या सीमावर्ती भागात संरक्षण स्थिती मजबूत होणार असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे. अर्थात भारतात यापेक्षा अधिक दमदार क्षेपणास्त्र आणि क्षेपणास्त्र विरोधी तंत्रज्ञान आहे.
