Nanded Crime | गर्भवती पत्नी, चार वर्षाची चिमुकली, सैनिक असलेल्या निष्ठूर बापाने तिघांना संपवलं

नांदेड जिल्हा हत्येच्या घटनांनी हादरला आहे. विशेष म्हणजे आरोपी हा सैन्य दलात आहे. आरोपीने आपल्या गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या चिमुकलीची हत्या केलीय. संबंधित घटनेनंतर पोलीस ठाण्याबाहेर ग्रामस्थ आक्रमक झाले.

Nanded Crime | गर्भवती पत्नी, चार वर्षाची चिमुकली, सैनिक असलेल्या निष्ठूर बापाने तिघांना संपवलं
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 4:25 PM

नांदेड, 13 सप्टेंबर 2023 : भारतीय सैन्य दलातील जवान आज सीमेवर देशाची रक्षा करत आहेत. देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या आणि दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना सैनिक धडा शिकवतात. भारतीय जवान आपल्या जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात. या जवानांना कर्तव्यावर असताना कोणतंही संकट आलं तरी ते मागे हटत नाहीत. ते दहशतवाद्यांच्या विरोधात दोन हात करतात. वेळप्रसंगी ते वीरमरण पत्करतात पण देशासाठी हार मानत नाही. भारतीय सैन्य दलातील जवानांचे आभार मानावे तितके कमी आहे. असं असताना भारतीय सैन्यातील जवानांची प्रतिमेला डाग लावणारा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.

सैन्य दलातील एका जवानाने आपल्याच पत्नीची आणि पोटच्या लेकीची हत्या केलीय. संबंधित प्रकार अतिशय संतापजनक आणि धक्कादायक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने आपल्या पत्नीची आणि अवघ्या चार वर्षाच्या लेकीची हत्या का केली असेल? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. संबंधित प्रकार हादरवणारा आहे. तसेच माणुसकीला काळीमा फासणारा आहे. एक पती आपल्या पत्नीची आणि एक बाप आपल्या चार वर्षाच्या लेकीची हत्या तरी कसं करु शकतो? असा प्रश्न उपस्थित झालाय.

आरोपी हत्येनंतर पोलिसांकडे गेला आणि…

भारतीय सैन्य दलातील जवानाने आपल्या गरोदर पत्नीसह चार वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केलीय. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बोरी गावात ही खळबळजनक घटना घडलीय. आरोपीने आपल्या पत्नीच्या पोटातील बाळालादेखील संपवलंय. हत्येनंतर आरोपी एकनाथ जायभाये हा स्वतः हून माळाकोळी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वतः पोलिसांकडे हत्येची कबुली दिली.

या घटनेनंतर माळाकोळी पोलीस ठाण्यात संतप्त ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या घटनेत आठ महिन्याची गरोदर असलेली 23 वर्षीय भाग्यश्री आणि तिची चार वर्षीय मुलगी सरस्वतीचा झोपेत असतानाच आरोपीने गळा दाबून दोघीला ठार केलंय. माळाकोळी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आरोपी स्वतः हून अटक झालाय. दरम्यान, मयत विवाहितेच्या माहेरच्यांनी आरोपी हा माहेरावरून प्लॉट घेण्यासाठी पैसे आणण्यासाठी तगादा लावत होता, असा आरोप केलाय. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Non Stop LIVE Update
देशात AI किती मोठे चॅलेंज?आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे नोकऱ्या धोक्यात?
देशात AI किती मोठे चॅलेंज?आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे नोकऱ्या धोक्यात?.
मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री आपल्याच सरकारवर भडकल्या? बघा कसं झापलं?
मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री आपल्याच सरकारवर भडकल्या? बघा कसं झापलं?.
'मनोज जरांगे हे बालबुद्धी, त्यांची अवस्था एक दिवस...,' - आशीष देशमुख
'मनोज जरांगे हे बालबुद्धी, त्यांची अवस्था एक दिवस...,' - आशीष देशमुख.
WITT : Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?
WITT : Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?.
... म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट
... म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट.
भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले
भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले.
WITT : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर..टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार
WITT : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर..टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार.
WITT : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर... - बरुण दास
WITT : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर... - बरुण दास.
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीटचा २रा दिवस, बॉलिवूडच्या दिग्गजांची हजेरी
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीटचा २रा दिवस, बॉलिवूडच्या दिग्गजांची हजेरी.
प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव
प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव.