8 लाखांची लाच घेणं शिक्षणाधिकाऱ्याला भोवलं, वैशाली झनकर यांना एसीबीकडून अटक

| Updated on: Aug 13, 2021 | 10:41 AM

शिक्षण संस्था चालकांकडून मंजुरीच्या कामासाठी चालकामार्फत 8 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यात. एसीबीने त्यांना अटक केलीय. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

8 लाखांची लाच घेणं शिक्षणाधिकाऱ्याला भोवलं, वैशाली झनकर यांना एसीबीकडून अटक
लाचखोरी प्रकरणात शिक्षणाधिकारी वैशाली झनकर फरार घोषित
Follow us on

नाशिक : शिक्षण संस्था चालकांकडून मंजुरीच्या कामासाठी चालकामार्फत 8 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यात. एसीबीने त्यांना अटक केलीय. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. विशेष म्हणजे आजच त्यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता.

दरम्यान, शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी 8 लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचा पाय आणखी खोलात गेलाय. लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याकडे कोट्यवधींची ‘माया’ असल्याचं समोर येतंय. विशेष म्हणजे शासनाने देखील शिक्षण आयुक्तांना वैशाली झनकर यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत. त्यामुळे आता शिक्षण आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.

आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर या सध्या फरार होत्या. त्यांनी आपली रवानगी तुरुंगात होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वतीने अॅड. अविनाश भिडे यांनी हा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी (14 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे.

नेमकं काय घडलं?

शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलंय. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

अनुदानाला मंजुरीसाठी संस्थेकडे 9 लाखांची मागणी, 8 लाखावर तडजोड

आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांनी एका संस्था चालकांकडे सरकारकडून मिळणारं 20 टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती. संस्था मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी करत होती. ही ऑर्डर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेकडून सुमारे 9 लाख रुपयांची लाच मागितली. यावेळी तक्रारदारांनी तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचे कबूल केले. मंगळवारी (10 ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला.

शासकीय वाहनावरील चालकाच्या माध्यमातून लाचखोरी

यानंतर वीर यांच्या शासकीय वाहनावरील चालक ज्ञानेश्‍वर सूर्यकांत येवले याने तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारली. याचवेळी चालक येवले यास पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांचे नाव घेतले. त्यानंतर पथकाने तत्काळ थेट झनकर यांच्या दालनात जाऊन चौकशी केली.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

थेट नाशिकच्या शिक्षणाधिकारीच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

‘जिथे जाऊ तिथे खाऊ’, लाच घेताना हवालदाराला अटक, बारामती पोलीस दलात खळबळ

लाच प्रकरणी नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस हवालदार गजाआड

ACB arrest Nashik Education officer in bribe case