लाच प्रकरणी नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस हवालदार गजाआड

पान मसाला विक्रीचा व्यवसाय सुरु ठेवण्याकरिता 32 हजार 500 रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) नवी मुंबई मालमत्ता आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रामदास छापरिया आणि पोलीस हवालदार इकबाल बशीर शेख या दोघांना रंगेहात पकडले

लाच प्रकरणी नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस हवालदार गजाआड
Bribe

नवी मुंबई : लाच प्रकरणी नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस हवालदाराला एसीबीच्या पथकाने गजाआड केलं आहे. पान मसाला विक्रीचा व्यवसाय सुरु ठेवण्याकरिता 32 हजार 500 रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) नवी मुंबई मालमत्ता आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रामदास छापरिया आणि पोलीस हवालदार इकबाल बशीर शेख या दोघांना रंगेहात पकडले (Navi Mumbai Senior Police Inspector And Police Constable Arrested In Bribery Case).

छापरिया यांच्यासाठी 25 हजार आणि स्वतः साठी 7 हजार 500 रुपयांची मागणी शेख याने केली होती. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी नवी मुंबईत करण्यात आल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली.

अटक केलेल्या दोघांनी तक्रारदारांकडे 40 हजारांची मागणी केली होती. त्यातच, तडजोडी अंती 32 हजार 500 रुपये देण्याचे ठरले. बुधवारी याप्रकरणी तक्रारदारांनी ठाणे एसीबी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, गुरुवारी याप्रकरणी पडताळणीही करण्यात आली. तसेच, लाचेची मागणी करत ती स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

लाचेची ही रक्कम एसीबीने हस्तगत केली असून त्या दोघांविरोधात नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्या दोघांना अटक केल्याची माहिती ठाणे एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलताना सांगितले. ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती यांच्या पथकाने केली आहे.

Navi Mumbai Senior Police Inspector And Police Constable Arrested In Bribery Case

संबंधित बातम्या :

VIDEO : नवोदित अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्यांना मनसेचा चोप

रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?; नवाब मलिकांचा थेट सवाल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI