रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?; नवाब मलिकांचा थेट सवाल

सरकारच्या परवानगीनेच फोन टॅप केले होते. मात्र, आता मला बळीचा बकरा केलं जात आहे, असा दावा ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केला आहे. (phone tapping issue: nawab malik ask question to rashmi shukla)

रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?; नवाब मलिकांचा थेट सवाल
nawab malik
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 11:53 AM

मुंबई: सरकारच्या परवानगीनेच फोन टॅप केले होते. मात्र, आता मला बळीचा बकरा केलं जात आहे, असा दावा ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?, असा थेट सवालच नवाब मलिक यांनी केला आहे. (phone tapping issue: nawab malik ask question to rashmi shukla)

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रश्मी शुक्ला यांना थेट सवाल केला. रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेऊन राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते, तर त्यांनी त्या काळातील मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? असा सवाल मलिक यांनी केला आहे. रश्मी शुक्लांच्या वकिलांनी कोर्टात शासकीय परवानगी घेऊन फोन टॅप केल्याचे सांगितले आहे. मात्र फोन टॅप करण्यासाठी दिशाभूल करून परवानगी घेण्यात आली आहे, असा आरोपहीही त्यांनी केला आहे.

बदली नाहीच

नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी राजद्रोह, देशद्रोह या नावाखाली परवानग्या घेतल्या होत्या. पुण्याच्या सीपी असताना त्या काळातील खासदार, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आधीपासूनच आरोप आहे, असं सांगतानाच आपली बदली झाल्याचं त्या ज्यापद्धतीने सांगत आहेत. त्यात काही तथ्य नाही. त्यांची ट्रान्स्फर झालेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बळीचा बकरा केला

पोलीस महासंचालकांच्या आदेशावरुनच रश्मी शुक्ला यांनी काही फोनवर देखरेख केली. रश्मी शुक्ला या पोलीस प्रमुखांच्या आदेशांचं पालन करत होत्या. शुक्ला यांनी टेलिग्राफ अधिनियमांनुसार राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचीही परवानगी घेतली होती. मात्र आता रश्मी शुक्ला यांना बळीचा बकरा बनवलं जात आहे, असा दावा शुक्ला यांचे वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात केला. सीताराम कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांना 17 जुलै 2020 पासून 29 जुलै 2020 पर्यंत फोन टॅपिंगची परवानगी दिली होती. कुंटे यांनी 25 मार्च 2021 रोजी सरकारला जो रिपोर्ट सादर केला, त्यामध्येही ही बाब नमूद आहे. मात्र ही परवानगी घेताना आपल्याला भ्रमित केलं होतं असं नंतर कुंटेंनी सांगितलं. त्यामुळे आता रश्मी शुक्लांना बळीचा बकरा केलं जात आहे, असं जेठमलानी म्हणाले.

5 ऑगस्ट रोजी सुनावणी

गुन्हे रोखण्यासाठी कायद्याच्या बंधनात राहून वायरलेस संदेशांवर देखरेख ठेवणे, टॅप करणे हे नियमांना धरून आहे, असा दावा रश्मी शुक्लांच्या वकिलांनी केला. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होईल. तोपर्यंत पोलिसांनी शुक्ला यांच्यावर कोणतीही दंडात्मक किंवा अटकेची कारवाई करु नये, असं हायकोर्टाने निर्देश दिले. रश्मी शुक्ला सध्या CRPF च्या अतिरिक्त महासंचालक आहेत. सध्या त्या हैदराबादमध्ये सेवा बजावत आहेत. (phone tapping issue: nawab malik ask question to rashmi shukla)

संबंधित बातम्या:

सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा

सरकारमध्ये आंतरविरोधाला सुरुवात, सध्या एक्स्ट्राऑर्डिनरी संकट, एक्स्ट्राऑर्डिनरी निर्णय घ्या : देवेंद्र फडणवीस

पूरग्रस्तांच्या खात्यावर शुक्रवारपासून 10 हजार रुपये जमा होणार; विजय वडेट्टीवार यांची माहिती

(phone tapping issue: nawab malik ask question to rashmi shukla)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.