Nashik Pawan Express Derailed : नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून घसरले; एकाचा मृत्यू, पाच जखमी

या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Nashik Pawan Express Derailed : नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून घसरले; एकाचा मृत्यू, पाच जखमी
नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून घसरले
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 5:34 PM

नाशिक : नाशिकमध्ये एलटीटी जयनगर पवन एक्स्प्रेस (Pawan Express)चे चार डब्बे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना रविवारी घडली आहे. देवळाली-लहवीत दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू (Death) झाला असून पाच प्रवासी जखमी (Injured) झाले आहेत. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनस्थळी बचाव कार्य सुरु आहे. तसेच अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन आणि मेडिकल व्हॅन घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्य सुरु आहे.

11061 एलटीटी जयनगर पवन एक्स्प्रेसचे डाऊन मार्गावर देवळाली-लहवीत दरम्यान दुपारी 3.10 वाजता रेल्वेरुळावरुन चार डबे घसरले. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून पाच प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

इतर बातम्या

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात इमारतीच्या डक्टमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

Pandharpur Crime : पंढरपूरमध्ये पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीकडून जीवे मारण्याचा प्रयत्न