Malegaon Cylinder Siezed : मालेगावमध्ये रिक्षात चक्क घरगुती गॅस भरला, पोलिसांच्या कारवाईत 30 सिलेंडर जप्त

| Updated on: May 03, 2022 | 3:29 PM

मालेगाव शहरातील भर वस्तीत असलेल्या सरदार चौकात चक्क एका टपरीत मोटरच्या सहाय्याने रिक्षात गॅस भरुन दिला जात आहे. दाट लोकवस्तीचा हा परिसर असताना देखील शासनाचे नियम धाब्यावर ठेवून रिक्षामध्ये गॅस भरला जात आहे. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत अनेक घरगुती वापराचे गॅस सिलेंडर व काही सामुग्री जप्त केली आहे.

Malegaon Cylinder Siezed : मालेगावमध्ये रिक्षात चक्क घरगुती गॅस भरला, पोलिसांच्या कारवाईत 30 सिलेंडर जप्त
मालेगावमध्ये रिक्षात चक्क घरगुती गॅस भरला
Image Credit source: TV9
Follow us on

मालेगाव : इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे दर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र वाढत्या इंधन दरवाढीवर तोडगा निघत नसल्यामुळे मालेगाव शहरातील रिक्षा चालकांनी चक्क स्वयंपाक घरातील गॅस (LPG Gas) रिक्षा (Rikshaw)त भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र हा स्वयंपाक घरातील गॅस रिक्षात भरणे धोकादायक आहे. असे असताना देखील मालेगाव शहरात अनेक ठिकाणी नागरी वस्तीत सर्रासपणे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षांमध्ये घरगुती गॅसचे इंधन भरले जात आसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या ठिकाणी कारवाई करीत 30 गॅस सिलेंडर आणि मोटर मशिनसह हा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. (In Malegaon police took action against those who filled lpg gas in rickshaws)

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई

मालेगाव शहरातील भर वस्तीत असलेल्या सरदार चौकात चक्क एका टपरीत मोटरच्या सहाय्याने रिक्षात गॅस भरुन दिला जात आहे. दाट लोकवस्तीचा हा परिसर असताना देखील शासनाचे नियम धाब्यावर ठेवून रिक्षामध्ये गॅस भरला जात आहे. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत अनेक घरगुती वापराचे गॅस सिलेंडर व काही सामुग्री जप्त केली आहे. मात्र इंधनाचे दर वाढलेत म्हणून रिक्षा चालकांनी हा जो जीवघेणा व्यवहार सुरु केला आहे. त्याबाबत नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. सरदार चौकात असलेल्या एका दुकानात सर्रासपणे रिक्षामध्ये गॅस भरुन दिला जात असल्याचे समजते. (In Malegaon police took action against those who filled lpg gas in rickshaws)

हे सुद्धा वाचा