AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heavy Rain Alert : 10, 11, 12 आणि 13 डिसेंबरला संकट, येलो अलर्ट जारी, राज्यात थंडीचा…

Maharashtra Weather Update : देशात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होताना दिसत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यात थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

Heavy Rain Alert : 10, 11, 12 आणि 13 डिसेंबरला संकट, येलो अलर्ट जारी, राज्यात थंडीचा...
cold alert
| Updated on: Dec 10, 2025 | 7:45 AM
Share

दरवर्षीच्या पावसाळ्यापेक्षा यंदा जास्त पावसाळा देशात झाला. अजूनही काही भागात पाऊस सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये विक्रमी पाऊस पडला. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडील थंडीमुळे राज्यातील गारठा वाढलाय. उत्तरेकडून थंडीगार वारे वाहत असल्याने राज्यात पुढील काही दिवसांसाठी थंडीची लाट आहे. पुण्याचा पारा 8.9 अंशावर गेला. गेल्या 24 तासात शहरातील किमान तापमानात लक्षणीय रित्या घट झाली आहे. त्यामुळे पुणेकर गारठले आहेत. पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात आणखी मोठी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र  विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडी कायम राहील अशी शक्यता आहे. मुंबईमध्येही तीच परिस्थिती आहे. पारा खाली जात असून थंडीमध्ये वाढ होत आहे.

राज्यातील निचांकी तापमान धुळ्यात नोंदवले गेलंय. 5.3 तापमानाची नोंद धुळ्यात झाली. उत्तरेकडून राज्यात शीत लाट आल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.भारतीय हवामान विभागाने राज्यात थंडीचा येलो अलर्ट जारी केला. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील काही दिवसात थंडी झपाट्याने वाढेल. उत्तर भारतात सध्या थंडीची तीव्र लाट आहे. पंजाबमधील गुरूदासपूर येथे देशातील निचांकी तापमानाची नोंद झाली.

तिथे 4.5 अंश तापमानाची नोंद झाली. परभणी येथे 5.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुणे, आहिल्यानगर, गोदिंया, जळगाव, भंडारा येथे 9 अंशांपेश्रा कमी तापमानाची नोंद झाली. अनेक जिल्ह्यांचा पारा 10 अंश सेल्सिअस नोंदवला गेला. त्यामध्येच पुढील काही दिवसांमध्ये थंडी अधिक वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत.

देशभरातील हवामान वेगळ्या पद्धतीने बदलत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 10, 11, 12 आणि 13 डिसेंबर रोजी अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला. केरळ, तामिळनाडू, कर्नाटकातील पुडुचेरी, कराईकल आणि माहे आणि अंदमान आणि निकोबार बेटांसह काही जिल्ह्यांमध्ये अधूनमधून मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला असून काही ठिकाणी अलर्टही जारी करण्यात आला.

कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल.
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम.
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण....
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?.
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?.
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?.
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर.
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्...
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्....
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात.