AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9, 10, आणि 11 डिसेंबरदरम्यान मोठे संकट, लाटेचा थेट इशारा, गारठ्यासोबतच…

Maharashtra Weather Update : गेल्या काही महिन्यांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी थंडी तर कधी पाऊस अशी परिस्थिती आहे. त्यामध्येच नुकताच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अलर्ट जारी केला आहे.

9, 10, आणि 11 डिसेंबरदरम्यान मोठे संकट, लाटेचा थेट इशारा, गारठ्यासोबतच...
cold snap
| Updated on: Dec 09, 2025 | 9:28 AM
Share

मयुरेश जाधव, मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही काही भागात पाऊस आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली आहे. राज्यात थंडीची लाट असून उत्तरेकडून थंडगार वारे राज्यात येतंय. यामुळे पारा सातत्याने खाली जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम आहे. किमान तापमानात घट असल्याने गारठ्याचे प्रमाण अधिक आहे. पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. थंडीच्या मोठ्या लाटेचा इशारा देण्यात आला. याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला.

उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे. तीन दिवस किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. किमान तापमान 15 अंश सेल्सिअसदरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी 22.2 अंश सेल्सिअस, सांताक्रूझ केंद्रात 18.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

सोमवारी सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद यवतमाळ येथे झाली. यवतमाळ येथे 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल गोंदिया 9 अंश सेल्सिअस, अमरावती 9.6 अंश सेल्सिअस, नांदेड 9.9 अंश सेल्सिअस, मालेगाव 9 अंश सेल्सिअस, अहिल्यानगर 9.5अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता.

विदर्भात सातत्याने आता थंडी झपाट्याने वाढताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी थंडीच्या लाटेचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 8 9, 10 आणि 11 डिसेंबर रोजी अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा जारी केला आहे. तीव्र थंडी पडेल. विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशातील काही ठिकाणी थंडीची लाट आहे.

अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय.
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.