AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

QR कोड खरा आहे की खोटा? पेमेंट करण्यापूर्वी ‘ही’ काळजी नक्की घ्या

आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाकडे ऑनलाईन पेमेंटचे पर्याय आहेत. अनेकदा आपण पैसे जवळ ठेवत नाही. कारण ऑनलाईन पेमेंट अनेकांना योग्य वाटते, पण पेमेंट करताना QR कोड बरोबर आहे की नाही, ते नक्की एकदा तपासून पाहा.

QR कोड खरा आहे की खोटा? पेमेंट करण्यापूर्वी 'ही' काळजी नक्की घ्या
| Updated on: Mar 14, 2026 | 2:51 PM
Share

आजच्या डिजिटल युगात एक रुपयाच्या चॉकलेटपासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत, किंवा पेट्रोल पंपावर पेमेंटपर्यंत, सर्वत ऑनलाईन पेमेंट होत आहेत. यासाठी QR कोड स्कॅन केले जातात. पण QR कोड स्कॅन करण्यासाठी देखील काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे… जाणून घ्या QR कोड स्कॅन करताना कोणती काळजी घ्याल… कारण पण अलीकडे, बनावट QR कोड देखील दिसू लागले आहेत. कोणता बनावट आहे.. कोणता मूळ आहे हे माहित नसल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे.

QR कोड स्कॅन करून पेमेंट करणे खूप सोपे असले तरी ते तितकेच धोकादायक आहे. बरेच लोक बनावट QR कोड वापरून लोकांना फसवतात. अशा परिस्थितीत, सामान्य माणसाला बनावट QR कोड कसा ओळखायचा हे माहित नसल्यामुळे त्याची फसवणूक होत आहे.

मूळ QR कोडवर बनावट QR कोड चिकटवून फसवणूक करणाऱ्यांच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे पैसे दुकानदाराऐवजी फसवणूक करणाऱ्याच्या खिशात जातात. म्हणून, पैसे देण्यापूर्वी QR कोड तपासा. जर तुम्हाला असे वाटत असेल तर दुकानदारालाही सावध करा.

ऑनलाइन पेमेंट करताना, स्क्रीनवर कोणाचे नाव दिसते ते तपासा. ते दुकानदाराच्या नावासारखेच आहे याची खात्री करा. जर वेगळे नाव दिसले तर पैसे चुकीच्या खात्यात जाणार नाहीत आणि तुमची आणि दुकानदाराची फसवणूक होणार नाही.

पेमेंट करण्यासाठी घाई करू नका. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर लगेच पे बटण दाबू नका. सर्व तपशील तपासल्यानंतर आणि खात्री केल्यानंतरच पेमेंट करा. या प्रक्रियेला जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिटे लागतात. परंतु पैसे चुकीच्या खात्यात जाणार नाहीत.

जर QR कोड तिरका किंवा अस्पष्ट असेल तर दुकानदाराशी संपर्क साधा. बऱ्याचदा कोड अस्पष्ट किंवा चुकीचा दिसतो. अशा परिस्थितीत, पूर्ण पडताळणी केल्यानंतरच पैसे भरा. याबद्दल माहिती दुकानदाराला विचारा. अशा काही शंका असतील तर, संबंधित व्यक्तीला विचारा आणि त्यानंतर पेमेंट करा. पैसे देतान कोणतीच घाईरु नका…

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर