नाशकात 22 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या, बाभळीच्या झुडपात मृतदेह

नाशिक जिल्ह्यात तळेगाव दिंडोरी येथील सावर्जनिक वाचनालयाच्या पाठीमागील बाभळीच्या झाडाच्या झुडपात एका तरुणाचा मृतदेह आढळला. घटनास्थळावरची परिस्थिती बघता त्याच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आल्याचे समोर आले.

नाशकात 22 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या, बाभळीच्या झुडपात मृतदेह
नाशिकमध्ये तरुणाची हत्या
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 7:23 AM

नाशिक : नाशिकचा दिंडोरी तालुका एका तरुणाच्या हत्येने हादरला आहे. दिंडोरीतील तळेगाव येथील घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिक जिल्ह्यात तळेगाव दिंडोरी येथील सावर्जनिक वाचनालयाच्या पाठीमागील बाभळीच्या झाडाच्या झुडपात एका तरुणाचा मृतदेह आढळला. घटनास्थळावरची एकंदरीत परिस्थिती बघता त्याच्या डोक्यात दगड टाकून हत्या झाल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

डोक्यात दगड टाकून हत्या

पोलिसांनी वेळेचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. दीपक जनार्दन जाधव असे मृत तरुणाचे नाव असून तो 22 वर्षांचा होता. तो याच परिसरातील असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या डोक्यात कुणीतरी दगड टाकून हत्या केली, असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तरुणाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनेचा तपास करत असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या :

मॅट्रिमोनी साईट्सवर तब्बल 41 महिलांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उल्हासनगरात कौटुंबिक वादातून एकाची हत्या, मुख्य आरोपी फरार तर दोन महिला आरोपींना अटक

 पुण्यात ‘तुमच्या मुलाने आंतजातीय विवाह केला’ असे म्हणत बहिष्कार टाकणाऱ्या जातपंचायतीच्या 5 जणांवर गुन्हा दाखल