अनैतिक संबंधात अडसर, मालेगावात प्रियकराच्या साथीने पत्नीने काढला पतीचा काटा

| Updated on: May 20, 2022 | 7:45 AM

दीपक सूर्यवंशीचा रोहिणीसोबत विवाह झाला होता. मात्र रोहिणीचे रविंद्र बुधा पवार या तरुणासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. या प्रेमाच्या मार्गात रोहिणीचा पती दीपक दोघांना अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी दीपकचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा निर्धार केला

अनैतिक संबंधात अडसर, मालेगावात प्रियकराच्या साथीने पत्नीने काढला पतीचा काटा
मालेगावात पतीची हत्या
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

मालेगाव : पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून (Husband Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीचा गळा दाबून पत्नीने त्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील टाकळी येथे ही घटना (Malegaon Nashik Crime News) घडल्याची माहिती आहे. लग्नानंतर प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर (Extra Marital Affair) ठरणाऱ्या पतीचा कायमस्वरूपी काटा काढण्याच्या उद्देशाने पत्नीने टोकाचं पाऊल उचललं. या हत्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावत मालेगाव तालुका पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या घातल्या आहेत. दीपक हिरामण सूर्यवंशी असे मयत पतीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टाकली येथील दीपक सूर्यवंशीचा रोहिणीसोबत विवाह झाला होता. मात्र रोहिणीचे रविंद्र बुधा पवार (रा. तळवाडे, तालुका मालेगाव) या तरुणासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. या प्रेमाच्या मार्गात रोहिणीचा पती दीपक दोघांना अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी दीपकचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा निर्धार केला. बुधवारी रात्री रोहिणी आणि रविंद्र यांनी संगनमताने दीपकचा गळा दाबून खून केला.

हे सुद्धा वाचा

अवघ्या 24 तासात गूढ उकलले

दरम्यान, गुरुवारी सकाळी हा प्रकार उघड झाल्यानंतर मयत दीपकचा भाचा सागर निकम (रा. टाकली, मालेगाव) याने पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत रोहिणीची चौकशी केली असता अवघ्या 24 तासात घडलेला प्रकार उघड झाला. पोलिसांनी निंबोळा येथून आरोपी रविंद्र पवार याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच रवींद्रने गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणी मालेगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून दोघांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली