नाशिकमध्ये ज्वेलर्समधील लुटालूट थांबेना, आता भरदिवसा डल्ला, 7 लाखांचे दागिने हातोहात लांबवले

| Updated on: Sep 25, 2021 | 8:56 AM

नाशिकच्या सिडको भागात पुन्हा एकदा ज्वेलरी शॉपमध्ये धाडसी चोरी झाली आहे. भरदिवसा 7 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. सामान घेण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी हे दागिने लांबवले.

नाशिकमध्ये ज्वेलर्समधील लुटालूट थांबेना, आता भरदिवसा डल्ला, 7 लाखांचे दागिने हातोहात लांबवले
नाशिकमध्ये ज्वेलरीमध्ये पुन्हा चोरी
Follow us on

नाशिक : नाशिकच्या (Nashik) सिडको (Cidco) भागात पुन्हा एकदा ज्वेलरी शॉपमध्ये (jewellery shop theft) धाडसी चोरी झाली आहे. भरदिवसा 7 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. सामान घेण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी हे दागिने लांबवले. याप्रकरणी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. मात्र वाढत्या चोरीच्या घटनेमुळे सिडको परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

सिडको परिसरात नुकतंच ज्वेलरी शॉपमध्ये चोरी झाली होती. त्याची पुनरावृत्ती झाल्याने नाशिकमधील कायदा सुवव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सिडको परिसरात काल दुपारी धाडसी चोरी झाली. भर दिवसा चोरट्यांनी 7 लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारला. हे चोरटे सामान घेण्याच्या बहाण्याने आले होते. त्यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर आसपासच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन 7 लाखांचे दागिने घेऊन पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. मात्र आता भरदिवसाही चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

बंदावणे परिसरातही ज्वेलर्समध्ये चोरी

नाशिकमधील (Nashik) सराफा (Jewellery shop) दुकानातून शुक्रवारी (24 सप्टेंबर) भरदिवसा 15 तोळे सोने आणि 6 हजारांची चोरी (Gold Theft) झाल्याने खळबळ उडाली होती. नवीन नाशिकमधील बंदावणे नगर परिसरातील न्यू सद्गुरू ज्वेलर्स या सराफा दुकानात शुक्रवारी सकाळी चोरीची घटना घडली. चोरट्यांनी 15 तोळे सोने आणि सहा हजारांची रोकड लंपास केली होती. सद्गुरू अलंकारचे मालक प्रमोद विभांडीक यांनी सकाळी दुकान उघडले. त्यांना दुकानाजवळ पडलेली घाण साफ करायची होती. त्यासाठी पाणी आणण्यासाठी ते दुकानातील मागीच्या बाजूला गेले. त्यांनी किराना दुकानदाराला दुकानावर लक्ष ठेवायला सांगितेल. त्यानंतर या किराणा दुकानात दोन तरुण आले. त्यांनी दुकानदाराची दिशाभूल केली. एक जण सराफा दुकानात घुसला आणि विभांडक यांनी दुकानात ठेवलेली बॅग लंपास केली. एकूण 150 ग्रमॅ वजनाचे हे सोने असून त्याची किंमत 7 लाखांच्या घरात आहे.

VIDEO : नाशिकच्या सिडको परिसरात ज्वेलर्समध्ये पुन्हा चोरी 

संबंधित बातम्या  

जोपर्यंत शहरात भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, पिंपरी चिंचवडच्या पोलीस कमिश्नरांचा अजब दावा

अलभ्य सुवर्णलाभ: होय, पुन्हा स्वस्त झाले; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!

सराफा दुकानातून 15 तोळे सोन्यासह 6 हजारांची रोकड लंपास; नाशिकमध्ये आज सकाळी झालेल्या धाडसी चोरीने खळबळ