सराफा दुकानातून 15 तोळे सोन्यासह 6 हजारांची रोकड लंपास; नाशिकमध्ये आज सकाळी झालेल्या धाडसी चोरीने खळबळ

नाशिकमधील (Nashik) सराफा (bullion) दुकानातून शुक्रवारी (24 सप्टेंबर) भरदिवसा 15 तोळे सोने आणि 6 हजारांची चोरी (Gold Theft) झाल्याने खळबळ उडाली आहे.

सराफा दुकानातून 15 तोळे सोन्यासह 6 हजारांची रोकड लंपास; नाशिकमध्ये आज सकाळी झालेल्या धाडसी चोरीने खळबळ
नाशिकमधील सराफा दुकानात भरदिवसा चोरी झाल्याने खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नाशिकः नाशिकमधील (Nashik) सराफा (bullion) दुकानातून शुक्रवारी (24 सप्टेंबर) भरदिवसा 15 तोळे सोने आणि 6 हजारांची चोरी (Gold Theft) झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. (Theft of 15 ounces of gold including 6,000 from bullion shops in Nashik)

नवीन नाशिकमधील बंदावणे नगर परिसरातील न्यू सद्गुरू ज्वेलर्स या सराफा दुकानात आज शुक्रवारी सकाळी चोरीची घटना घडली. चोरट्यांनी 15 तोळे सोने आणि सहा हजारांची रोकड लंपास केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सद्गुरू अलंकारचे मालक प्रमोद विभांडीक यांनी सकाळी दुकान उघडले. त्यांना दुकानाजवळ पडलेली घाण साफ करायची होती. त्यासाठी पाणी आणण्यासाठी ते दुकानातील मागीच्या बाजूला गेले. त्यांनी किराना दुकानदाराला दुकानावर लक्ष ठेवायला सांगितेल. त्यानंतर या किराणा दुकानात दोन तरुण आले. त्यांनी दुकानदाराची दिशाभूल केली. एक जण सराफा दुकानात घुसला आणि विभांडक यांनी दुकानात ठेवलेली बॅग लंपास केली. एकूण 150 ग्रमॅ वजनाचे हे सोने असून त्याची किंमत 7 लाखांच्या घरात आहे. या धाडसी चोरीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे यांच्यासह पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. सराफा दुकानात आणि दुकानाच्या परिसरात सीसीटीव्ही लावले आहेत. त्यामुळे चोरटे या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, गेल्या दिवसांमध्ये नाशिकमध्ये खून, चोरी, लूटमार असे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक सायंकाळच्या वेळी एकटे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिला नाही, पोलीस हेल्मेट सक्तीमध्ये व्यस्त असल्याचा आरोप नाशिककरांकडून केला जात आहे.

कारची काच फोडून लूट

शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपये असलेली बॅग लुटली. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयराम नेवदराम दियालानी (रा. टागोनगर) यांनी शनिवारी दुपारी आपली कार (एम. एच.15 ईआर 3133) शालिमार भागातील सांगली बँक सिग्नल परिसरातील जगन्नाथ रेस्टॉरंटसमोर उभी केली होती. तेव्हा चोरट्याने या कारची काच फोडली. चालकाच्या सीटवर असलेली बॅग लंपास केली. या बॅगेमध्ये अडीच लाखांची रक्कम आणि महत्त्वाची कागपदत्रे होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Theft of 15 ounces of gold including 6,000 from bullion shops in Nashik)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये वाढत्या रुग्णांची चिंता, लसीकरणाचा वेग वाढवा; पालकमंत्री भुजबळांच्या प्रशासनाला सूचना

आनंदवार्ताः नाशिकमध्ये नोकरीच्या 227 संधी; 27 सप्टेंबरपासून ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI