नाशिकमध्ये पल्सरवरल्या तरुण मित्रांना अज्ञात वाहनाने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू

| Updated on: Sep 23, 2021 | 5:09 PM

पल्सर जाणाऱ्या दोन मित्रांना नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या सिन्नरजवळील (Sinnar) महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नाशिकमध्ये पल्सरवरल्या तरुण मित्रांना अज्ञात वाहनाने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
सिन्नरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मित्रांचा मृत्यू झाला.
Follow us on

नाशिकः पल्सरवर जाणाऱ्या दोन मित्रांना नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या सिन्नरजवळील (Sinnar) महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर वाहनचालक फरार आहे. सचिन चकोर (वय 28) आणि शिवम गिते (वय 18) अशी त्यांची नावे आहेत. (Two young friends killed in an accident in Nashik, hit by an unknown vehicle)

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सचिन हा सिन्नमधील संजीवनीनगरचा आहे, तर शिवम सिन्नरमधील ढोकेनगर येथे रहायचा. दोघांची घनिष्ट मैत्री होती. ते पल्सरवरून (एम. एच. 15 एफ. डब्लू. 7862) मुसळगावाकडून सिन्नरकडे येत होते. यावेळी समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. फरार वाहनचालकाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहेच. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ तपास करत आहेत. दरम्यान, सिन्नर नगरपरिषद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दोन तरुण मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सख्खे तरुण भाऊ अपघातात ठार

दारूचे व्यसन सोडविण्यासाठी गेलेले सख्खे तरुण भाऊ अपघातात ठार झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंटजवळ घडली आहे. गोरख लक्ष्मण जाधव (वय 35) सोमनाथ लक्ष्मण जाधव भाऊ (वय 25) अशी मृतांची नावे आहेत. इगतपुरी तालुक्यातील मुरंबीत गोरख जाधव रहायचे. त्यांचा लहान भाऊ सोमनाथला दारूचे व्यसन होते. त्यामुळे गोरख हे सोमनाथ यांना दारूचे व्यसन सोडविण्यासाठी वणी येथे दुचाकीवरून घेऊन गेले होते. वणी येथे औषधोपचार करून ते गावाकडे निघाले. तेव्हा परतीच्या प्रवासात मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंटजवळील उड्डाण पुलावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नीसह दोघांनाही दोन मुली, बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी अबंड पोलिस ठाण्यात गुन्हा वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारची काच फोडून लूट

शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपये असलेली बॅग लुटली. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयराम नेवदराम दियालानी (रा. टागोनगर) यांनी शनिवारी दुपारी आपली कार (एम. एच.15 ईआर 3133) शालिमार भागातील सांगली बँक सिग्नल परिसरातील जगन्नाथ रेस्टॉरंटसमोर उभी केली होती. तेव्हा चोरट्याने या कारची काच फोडली. चालकाच्या सीटवर असलेली बॅग लंपास केली. या बॅगेमध्ये अडीच लाखांची रक्कम आणि महत्त्वाची कागपदत्रे होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Two young friends killed in an accident in Nashik, hit by an unknown vehicle)

इतर बातम्याः

कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यास मागता येईल दाद; पोलिसांविरुद्धच्या तक्रारीसाठी नाशिकमध्ये प्राधिकरण

पैलवानांच्या मदतीने साडेसात किलो सोन्याची लूट…तब्बल साडेतीन कोटींचा ऐवज…चोरों का राजा नाशिकचा