तुमच्या डोळ्यादेखत होतेय गांजाची तस्करी, पोलिसांनी केला भांडाफोड; नाशिक पोलिसांची दबंग कामगिरी

| Updated on: May 03, 2023 | 6:03 PM

नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना ट्रक सह अटक करत लाखो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी केलेली ही कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे.

तुमच्या डोळ्यादेखत होतेय गांजाची तस्करी, पोलिसांनी केला भांडाफोड; नाशिक पोलिसांची दबंग कामगिरी
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गांजाची तस्करी होईल असं बोललं जात होतं. पण, पोलिसांच्या कारवाई समोर आलेली धक्कादायक बाब पाहून खळबळ उडाली आहे. नाशिकच्या वडालागावात ही कारवाई करण्यात आली असून अमली पदार्थ साठवून ठेवण्यात आलेल्या घरावर छापा टाकून कारवाई केली आहे. यामध्ये लाखो रुपयांचासाडे आठ किलो गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अमली पदार्थाची सर्रास पणे विक्री होत असल्याची चर्चा सुरू असताना त्यावर शिक्का मोर्तब झाला आहे. तर यामध्ये चक्क ट्रॅव्हल्समधून वाहतूक होत असतांना 62 किलो गांजा पकडण्यात आला असून त्यात दोघांना अटक करण्यात आली आहे.

नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना ट्रक सह अटक करत लाखो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी केलेली ही कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामध्ये वडाला गाव कनेक्शन समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात लाखो रुपयांचा गांजा हाती लागला असून ट्याची सखोल चौकशी केली जात आहे. यामध्ये इंदिरानगर पोलिसांनी गजाआड केले आहे.

हे सुद्धा वाचा

खरंतर दोन दिवसांपूर्वी नाशिक शहर पोलिसांनी अचानक पहाटेच्या वेळेला कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. त्याच दरम्यान एका वसाहतीत शिरल्यानंतर माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. त्यामध्ये पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली.

दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत असतांना त्यांच्या घराची कडी तोडून आतमध्ये प्रवेश करत चौकशी केली. त्यानुसार लाखो रुपयांचा गांजा सापडलानं पोलिसही चक्रावून गेले आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी केले आहेत.

एका कापडी पिशवी ८ किलो ५४६ किलो वजनाचा गांजा लपून ठेवण्यात आला आहे. या गांजाची किंमत सुमारे एक लाख 2 हजार 525 रुपये आहे. याप्रकरणी संशयित इम्तियाज उमर शेख यास अटक केली असून, इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.