दिवसा मजूरी अन् रात्रीची चोरी, चोरीची ‘हा’ पॅटर्न पाहून पोलिसही चक्रावले, ग्रामीण पोलिसांच्या कारवाईने खळबळ

| Updated on: Mar 28, 2023 | 3:52 PM

नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत चोरीचा नवा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या चोरीच्या घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

दिवसा मजूरी अन् रात्रीची चोरी, चोरीची हा पॅटर्न पाहून पोलिसही चक्रावले, ग्रामीण पोलिसांच्या कारवाईने खळबळ
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : चोरीसाठी करण्यासाठी चोर नेहमी नवनवीन शक्कल लढवत असतात. मात्र, पोलिसांनी चोरी उघडकीस केली की नवनवीन घटना समोर येतात. अशीच एक चोरीची घटना नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणली आहे. खरंतर ही चोरीची घटना उघडकिस आल्यानंतर ग्रामीण भागात खळबळ उडाली असून पोलिस देखील चक्रावून गेले आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सायखेडा पोलिस ठाण्यात एक दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून ही चोरीची घटना समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सोनगाव येथील सुनील विष्णु दरगुडे यांची दुचाकी चोरीला गेली होती. त्यानंतर काही दिवसांनी सायखेडा येथील जावेद फकीर शाह यांची दुचाकी चोरीला गेली होती.

या दोन्ही तक्रारदारांनी सायखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुण सायखेडा पोलिसांनी दुचाकी चोरीची नोंद करून घेत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सायखेडा पोलिसांनी तपास सुरू केला होता.

हे सुद्धा वाचा

तपास करत असतांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने एका संशयिताला ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास करत असतांना थेट अहमदनगर गाठले होते. आणि तिथून दोघांना पकडले होते.

यामध्ये तिघांची चौकशी करत असतांना त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. यामध्ये विनायक बर्डे, सुखराम मोर आणि अर्जुन मोर असे संशयित आरोपींची नावे असून दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहे.

यामध्ये दुसऱ्या परिसरात जाऊन संशयित आरोपी हे मजुरीचे काम शोधत असे. कुणी वीट भट्टीवर तर कुणी शेतीचे काम शोधत होते. त्यामुळे काम भेटले की परिसरात पाहणी करून ठेवत होते. त्यानंतर संधी मिळाली की चोरी करून पळून जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.