मुलाची ‘ती’ गोष्ट खटकायची, बापाने नात्याला काळीमा फसणारेच कृत्य केलं, तुम्ही कल्पनाच करू शकत नाही…

अनेकदा रागाच्या भरात अनेकदा गुन्हा घडवून जातो. त्यानंतर पश्चाताप करण्यापलीकडे हाती काहीही लागत नाही. त्यामुळे असाच पश्चाताप एका मुलाच्या वडिलांना करण्याची वेळी आहे.

मुलाची ती गोष्ट खटकायची, बापाने नात्याला काळीमा फसणारेच कृत्य केलं, तुम्ही कल्पनाच करू शकत नाही...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 08, 2023 | 2:05 PM

नाशिक : रागाच्या भरात माणूस कुठले कृत्य करेल याचा काही नेम नसतो. मात्र, यामध्ये अनेकांना आपल्या नात्याचा सुद्धा विसर पडतो. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील जायखेडा परिसरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जन्मदात्या पित्यानेच आपल्या मुलाची हत्या केली आहे. दारूच्या नशेत असतांना राग अनावर झाल्याने ही घटना घडली असून यामागील कारण ऐकून पोलिसांना सुद्धा धक्का बसला आहे. महत्वाची बाब म्हणजे लाकडी दांडा डोक्यात टाकून मुलाला संपविले आहे. या घटनेने आनंदपुर पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. जायखेडा पोलिसांनी या प्रकरणी जन्मदात्या पित्यावर म्हणजेच साहेबराव चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आनंदपुर येथे धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये वडील साहेबराव चव्हाण यांनी आपला मुलगा राजेंद्र चव्हाण यांची हत्या केली आहे.

देवपूर पाड्यावर चव्हाण कुटुंब राहत होते. त्यामध्ये संशयित साहेबराव चव्हाण आणि पत्नी आणि मयत मुलगा राजेंद्र हे राहत होते. मात्र, वारंवार मुलाचे आणि वडिलांचे कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद होत होते.

मात्र, घरात कुणी ना कुणी असतांना वाद मिटवले जात होते. बुधवारी साहेबराव चव्हाण यांच्या पत्नी जिजाबाई आणि बहीण लीलाबाई चव्हाण या सप्तशृंगी गडावर दर्शना करिता गेल्या होत्या. त्याच वेळी साहेबराव चव्हाण आणि मुलगा राजेंद्र दोघे घरीच होते.

याच दरम्यान दोघांमध्ये नेहमीप्रमाणे वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या साहेबराव चव्हाण मुलगा राजेंद्र याच्या डोक्यात लाकडी दांडा मारला, त्याच वेळी राजेंद्र जमिनीवर कोसळले. डोक्याला मोठा मार लागल्याने मोठ्याप्रमाणात इजा झाली होती.

याच वेळेला गावचे पोलिस पाटील दिलीप सोनवणे यांनी साहेबराव चव्हाण यांच्या घराजवळून जातांना ओट्यावर मुलगा पडलेला दिसला. रक्ताने भरलेला दिसला. तयांनी विचारपूरस करतात त्याने आपण मुलाला मारल्याचे सांगितले.

त्याच वेळी पोलिस पाटील यांनी स्वतः जाऊन पाहणी करत पोलिसांना माहिती दिली. जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली आणि त्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली असून अधिकचा तपास केला जात आहे.