2 निकाह, 20 गर्लफ्रेंड आणि 10 जणींसोबत रिलेशन; राहुल बनून तो महिलांना… काय आहे भानगड?

एका तरुणाने 20 ते 25 मुलींची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या आरोपीचे नाव नौशाद त्यागी असे असून तो 32 वर्षांचा आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

2 निकाह, 20 गर्लफ्रेंड आणि 10 जणींसोबत रिलेशन; राहुल बनून तो महिलांना... काय आहे भानगड?
Naushad Tyagi
| Updated on: Jul 09, 2025 | 3:05 PM

देशात गेल्या काही दिवसांपासून प्रेमप्रकरण आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अशातच आता एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाने 20 ते 25 मुलींची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या आरोपीचे नाव नौशाद त्यागी असे असून तो 32 वर्षांचा आहे, तो मुझफ्फरनगरमधील चर्थवल येथील रहिवासी आहे.

नौशादने वेगवेगळ्या नावांने मुलींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जर मुलगी हिंदू असेल तर तो आपले नाव राहुल किंवा रिकी असे सांगायचा आणि मुलगी मुस्लीम असेल तर नौशाद असे नाव सांगायचा. तसेच तो उत्तर प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल आहे असंही सांगायचा. त्याची दोन लग्न झालेली आहेत, त्याची पहिली त्याच्यापेक्षा 23 वर्षांनी मोठी आहे. त्याने 4 राज्यांमधील 20 मुलींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 10 जणींशी त्याचे शारीरिक संबंध असल्याचेही समोर आले आहे.

मोबाईलमध्ये सापडले अश्लील फोटो आणि व्हिडिओ

समोर आलेल्या माहितीनुसार नौशाद गेल्या 3 वर्षांपासून मुलींची फसवणूक करत होता. त्याच्या मोबाईलमध्ये बऱ्याच महिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. तो पोलिसाच्या वेशात वावरत होता, त्यामुळे महिला त्याच्या जाळ्यात अडकत असत. पण त्याला पोलिसाची वर्दी कशी मिळाली ते जाणून घेऊयात.

नौशाद उत्तर प्रदेशातील संभल येथे पोलिस कॉन्स्टेबल मित्रासोबत राहत होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्याच्या मित्राला मध्य प्रदेशला जावे लागले, मात्र त्यावेळी त्याची वर्दी नौशादजवळ राहीली. तेव्हापासून नौशादने मुलींची फसवणूक करायला सुरुवात केली.

20 महिलांना फसवले

तो प्रथम मुझफ्फरनगरला आला व त्याने गणवेश घातला व कॉन्स्टेबल अशी बतावणी केली.तो सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून विधवा किंवा पतीपासून दूर राहणाऱ्या महिलांचा शोध घेत असे. यानंतर तो या प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. हाच फंडा वापरत त्याने मथुरा, संभल, नोएडा, गाझियाबाद, आसाम, मेघालय आणि दिल्लीमधील तब्बल 20 महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे.

10 महिलांशी शारीरिक संबंध

हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. यात नौशादने 10 महिलांशी शारीरिक संबंध होते अशी माहिती दिली. त्याने राहुल त्यागी, कधी रिकी त्यागी आणि कधी नौशाद त्यागी अशा वेगवेगळ्या नावांच्या नेम प्लेट्सही बनवल्या होत्या. तसेच त्याने पोलिसाची वर्दी घालत पैसेही कमावले आहेत.

नौशादचा भांडाफोड कसा झाला?

नौशादने एका विधवा महिलेला जाळ्यात अडकवले होते, ही महिला महिला किराणा दुकान चालवायची. तो पोलिसाच्या वर्दीत दुकानात जात असे, कालांतराने त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि महिलेशी संबंधही निर्माण केले. तसेच तिच्याकडून सुमारे 2 लाख 75 हजार रुपये घेतले. त्यानंतर सुमारे 3 लाख रुपयांचे दागिनेही घेतले. मात्र त्यानंतर तो तिच्यापासून दूर जाऊ लागला, संशय आल्याने महिलेने पोलिसांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी नौशादला अटक केली असून त्याची सखोल चौकशी केली असला हा सर्व प्रकार समोर आला आहे.