जनतेचा रक्षक निघाला तस्कर, नवापूरच्या नगरसेवकाकडून गुजरातमध्ये दारुची तस्करी, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

गुजरातमध्ये दारुबंदी आहे. मात्र, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये दारुची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे (Navapur corporator Vishal Sangale caught by smuggling Liquor).

जनतेचा रक्षक निघाला तस्कर, नवापूरच्या नगरसेवकाकडून गुजरातमध्ये दारुची तस्करी, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
प्रातिनिधिक फोटो

नंदूरबार : गुजरातमध्ये दारुबंदी आहे. मात्र, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये दारुची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे सीमाभागानजीक असलेल्या नवापूर शहरातील नगरसेवक विशाल केशव सांगळे याचं देखील या प्रकरणात नाव आलं आहे. विशाल सांगळे हा नवापूरमधील अपक्ष आमदार आहे. तो 31 वर्षांचा असून नवापूरच्या जनता पार्क भागात वास्तव्यास आहे. याप्रकरणी गुजरातच्या उकई पोलिसांनी नगरसेवक सांगळे याच्यासह दोघांना अटक केली आहे (Navapur corporator Vishal Sangale caught by smuggling Liquor).

पोलिसांनी कारवाई कशी केली?

गुजरातच्या तापी जिल्ह्यातील उकई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या आय 20 कारमधून अवैधरित्या भारतीय बनावटीची इंग्लिश दारूची तस्करी केली जात होती. संबंधित कार गुजरातच्या दिशेला जात होती. पोलिसांना याबाबत सुगावा लागला. त्यांनी गुजरातच्या तापी जिल्ह्यातील गुणसदा नवागाव फळ्यानजीक संबंधित कारला अडवलं. पोलिसांनी कारच झडती घेतली. यावेळी पोलिसांना कारमध्ये 14 हजार 400 रुपये किंमतीची दारुचे स्टिन, 48 दारु नग मिळाले. पोलिसांनी तीन लाखांच्या कारसह आरोपींकडे असलेले तीन मोबाईलही जप्त केली. उकाई पोलिसांनी मोबाईल, कारसह जवळपास 3 लाख 52 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नगरसेवकासोबत त्याचे दोन सहकारी कोण?

पोलिसांनी अटक केलेल्या तिघांपैकी दोन हे नवापूरचे रहिवासी आहेत. यामध्ये एक नवापूर शहरातील प्रभाग क्रमांक दोनचा नगरसेवक आहे. तर तिसरा हा गुजरातच्या तापी जिल्ह्यातील उच्चल तालुक्याच्या फुलवाडी गावातील रहिवासी आहे. फुलवाडी गावाच्या तरुणातं नाव दानियल साकऱ्या गामीत असं आहे. त्याचं वय 28 वर्ष इतकं आहे. तर नगरसेवकाच्या दुसऱ्या जोडीदाराचं नाव हे किसन अजय मेहता असं आहे. तो नवापूरच्या शिवाजी रोडवरील दत्त मंदिर परिसरात राहतो. त्याचं वय 27 वर्षे इतकं आहे.

राजकीय क्षेत्रात खळबळ

अपक्ष नगरसेवक विशाल केशव सांगळे याच्यासह त्याच्या दोन्ही सहकाऱ्यांविरोधात कलम 65 ई, 98(2)81 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना गुजरात राज्यातील उकई पोलीसांनी अटक केली आहे. तिघांना गुजरात राज्यातील उकई पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान, नगरसेवकाला दारु तस्करी प्रकरणी अटक झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे (Navapur corporator Vishal Sangale caught by smuggling Liquor).

हेही वाचा : पाच मुलांचा बाप, वय 60 वर्ष, दुसऱ्या लग्नाच्या हट्टासाठी विजेच्या खांबावर चढून गोंधळ

Published On - 3:53 pm, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI