AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच मुलांचा बाप, वय 60 वर्ष, दुसऱ्या लग्नाच्या हट्टासाठी विजेच्या खांबावर चढून गोंधळ

राजस्थानच्या एका गावात 60 वर्षीय वृद्ध दुसऱ्या लग्नाच्या हट्टासाठी विजेच्या खांब्यावर चढल्याची माहिती समोर आली आहे (Old man climbs electric pole because he wants second marriage).

पाच मुलांचा बाप, वय 60 वर्ष, दुसऱ्या लग्नाच्या हट्टासाठी विजेच्या खांबावर चढून गोंधळ
| Updated on: Mar 10, 2021 | 2:54 PM
Share

मुंबई : ‘शोले’ चित्रपटात विरु बसंतीसोबत लग्न करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून गोंधळ घालतो हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. मात्र, तो एक चित्रपट होता. चित्रपटात काहीही घडू शकतं. पण वास्तवात असं काही घडलं तर ती घटना चर्चेला कारण ठरते. काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून विजेच्या खांब्यावर चढल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा तशाच प्रकारची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या एका गावात 60 वर्षीय वृद्ध दुसऱ्या लग्नाच्या हट्टासाठी विजेच्या खांब्यावर चढल्याची माहिती समोर आली आहे (Old man climbs electric pole because he wants second marriage).

वृद्धाला तीन मुलं आणि दोन मुली

राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एक 60 वर्षीय वृद्ध दुसऱ्या लग्नाच्या हट्टासाठी चक्क विजेच्या खांब्यावर पोहोचला. विशेष म्हणजे त्याला तीन मुलं आणि दोन मुली आहेत. या सर्वांचे लग्न झालं आहे. त्यांनादेखील लहान मुलं आहेत. तर वृद्धाच्या पत्नीचं चार वर्षांपूर्वी निधन झालं. त्यामुळे वृद्ध सध्या आयुष्यात एकटा पडला आहे (Old man climbs electric pole because he wants second marriage).

लग्नासाठी वृद्धाकडून कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न

आयुष्यातील एकटेपण दूर सारावं यासाठी वृद्धाची दुसरं लग्न करण्याची इच्छा आहे. पण त्याच्या कुटुंबाकडून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याने थेट विजेच्या खांब्यावर चढून शोले स्टाईल कुटुंबावर दबाब टाकायचं ठरवलं. त्यानुसार तो विजेच्या खांब्यावर चढला.

मोठी दुर्घटना टळली

वृद्ध ज्यावेळी विजेच्या खांब्यावर चढला त्यावेळी सुदैवाने वीज बंद होती. वृद्ध व्यक्ती विजेच्या पोलवर चढल्यानंतर वाऱ्यासारखी बातमी संपूर्ण गावात पसरली. याशिवाय महावितरणाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत देखील याबाबतची माहिती पोहोचली. त्यानंतर त्यांनी त्या भागातील इलेक्ट्रिक कनेक्शन कापलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, गावातील नागरिकांनी वृद्धांची समजूत घातली. गोड बोलून वृद्धाला विजेच्या पोलखाली उतरवलं. हा सर्व प्रकार काही लोकांनी कॅमेऱ्यातही कैद केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हेही वाचा : खासदार मोहन डेलकर आत्महत्येचा तपास CBI कडे द्या, लोकसभेत शिवसेना खासदाराची मागणी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.